मक्याच्या शेतात बलात्कार करुन तरुणीला जिवंत जाळले; पोलिस म्हणतात, 'तुम्हीच मारले असेल!' संतप्त नातेवाईकांनी काय केलं बघा?

मुंबई तक

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह मक्याच्या शेतात अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळला. चार नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा व शरीर ॲसिडने जाळल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मक्याच्या शेतात बलात्कार करुन तरुणीला जिवंत जाळले

point

पोलिस म्हणतात, 'तुम्हीच मारले असेल!'

point

संतप्त नातेवाईकांनी थेट..

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह मक्याच्या शेतात अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळला. चार नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा व शरीर ॲसिडने जाळल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, हजारो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरुन राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : घरच्यांचा विरोध असताना लव्ह मॅरेज, मुलगी झाल्यानंतर दोन वर्षांनी सासरी गेला, पण सासऱ्याने अन् मेहुणीने जागेवर संपवलं

शौचाला जाण्यासाठी बाहेर पडली अन्..

11  मार्चच्या रात्री ही तरुणी शौचाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. पीडिता दररोज अभ्यासासाठी एके ठिकाणी जात असे, जिथे तिचा संपर्क आरोपींशी आला होता. संशयित आरोपी सचिन कुमार यानेच तिला पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. शोध घेत असताना अखेर एका हॉटेलच्या मागील मक्याच्या शेतात तिचा जळालेला मृतदेह सापडला. आपल्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून पालकांनी हंबरडा फोडला असून, नराधमांनी साक्ष पुसण्यासाठीच केमिकलचा वापर केल्याचा दावा केला आहे.

'तुम्हीच मुलीला मारले असेल..'

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वेळेत तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. हताश झालेले नातेवाईक जेव्हा पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी गेले, तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांनाच धमकावत 'तुम्हीच तुमच्या मुलीला मारून फेकले असेल,' असे विधान केल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती, तर आज मुलीचे प्राण वाचले असते, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp