मुलाने 13व्या मजल्यावरून मारली उडी, फ्लॅटमध्ये आईचा कुजलेला मृतदेह.. दुहेरी मृत्यूने सोसायटीत घबराट
गाझियाबादच्या महागुनपुरम सोसायटीमध्ये 40 वर्षीय राजवीरने 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तर त्याच्याच फ्लॅटमध्ये त्याच्या 70 वर्षीय आई, सतनाम कौर हिचा देखील मृतदेह सापडल्याने सोसायटीमध्ये एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT

गाझियाबाद: गाझियाबादच्या कविनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महागुनपुरम सोसायटीमध्ये घडलेल्या दुहेरी गूढ मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका बाजूला 40 वर्षीय व्यक्तीने 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या फ्लॅटमध्ये त्याच्या 70 वर्षीय आईचा दोन दिवसांपूर्वीचा मृतदेह आढळला होता. जो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डायल 112 वरून एक कॉल आला की, विनायक टॉवरच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही माहिती मिळताच, कविनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीला जवळच्या खासगी मणिपाल रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
फ्लॅटमध्ये आईचा आढळला मृतदेह
मृत व्यक्तीची ओळख राजवीर (वय 40) अशी पटली असून, तो महेंद्र सिंग यांचा मुलगा होता आणि त्याच फ्लॅटमध्ये त्याची आई सतनाम कौर (वय 70) यांच्यासोबत राहत होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना सतनाम कौर यांचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला, जो सुमारे दोन दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे. त्यांच्या मृतदेहावर जखमांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.
हे ही वाचा>> मामीसोबत अनैतिक संबंध... बहिणीसोबत लग्न आणि सासू-मेव्हण्याची हत्या, पार चक्रावून टाकणारी कहाणी
आई सतनाम कौर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. पण सध्या, या दोन्ही मृत्यूंमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.










