'काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर...' अनामिका का कापली जाते? सुषमा अंधारेंनी काय सांगितले?

मुंबई तक

Sushma Andhare Press Conference : भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर चांगल्याच अडकल्या आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या नार्को टेस्टची आणि अटकेची मागणी केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक सनसनाटी दावे केले. यावेळी त्यांना अनामिका का कापली जाते असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी काय सांगितलं जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Sushma Andhare Press Conference
Sushma Andhare Press Conference
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर...'

point

अनामिका का कापली जाते?

point

सुषमा अंधारेंनी काय सांगितले

Sushma Andhare Press Conference : भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर चांगल्याच अडकल्या आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या नार्को टेस्टची आणि अटकेची मागणी केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक सनसनाटी दावे केले. यावेळी त्यांना अनामिका का कापली जाते असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी काय सांगितलं जाणून घेऊया.

हे ही वाचा : रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली, त्या स्वत: तंत्रमंत्र विद्या करायच्या; सुषमा अंधारेंनी फोटो दाखवले

...म्हणून अनामिका कापली जाते

या पत्रकार परिषदेत अंधारेंनी रुपाली चाकणकरांचे अनामिकेला झालेल्या जखमेचे फोटो दाखवले. यावेळी त्यांना अनामिका कशासाठी कापली जाते याविषयी विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, 'माझा कोणत्याही कर्मकांडावर विश्वास नाही. पण रात्री उशिरापर्यंत मी तंत्र-मंत्राविषयी अभ्यास करत बसले, तेव्हा मला कळलं की अनामिका का कापली जाते. सूर्य म्हणजे यश, शुक्र म्हणजे आकर्षण. यश मिळवायचं असेल, काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर अनामिका कापली जाते. ती कापताना विशिष्ट वेळ निवडली जाते. अमावस्या वगैरे.'

ती दुसरी व्यक्ती कोण?

यापुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, 'आता जे आम्हाला पीडितांकडून फोटो मिळाले त्या फोटोंच्या तारखांचे पंचांग काय हे आम्ही शोधले. तर त्यानुसार  2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या होती असं एक कॅलेंडर समोर येते. आता त्या पीडितांचं म्हणणं होतं की, दोन लोकांनी अनामिका कापली होती. आता ती दोन माणसं कोण? मला एक व्यक्ती कळली. मला दुसरी व्यक्ती अजून कळली नाही. जोपर्यंत माझ्या हातात पुरावे नसतात त्यावर मी बोलत नाही.'