रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली, त्या स्वत: तंत्रमंत्र विद्या करायच्या; सुषमा अंधारेंनी फोटो दाखवले

मुंबई तक

Sushma andhare on Rupali Chakankar : "पीडित महिलेने आम्हाला रुपाली चाकणकर स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या असं सांगितलं", असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवाय, चाकणकरांनी स्वत: अनामिका कापली होती, असा दावाही अंधारेंनी केला आहे.

ADVERTISEMENT

Sushma andhare on Rupali Chakankar
Sushma andhare on Rupali Chakankar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली

point

त्या स्वत: तंत्रमंत्र विद्या करायच्या ;

point

सुषमा अंधारेंने फोटो दाखवले

Sushma andhare on Rupali Chakankar, पुणे : "काही पीडित महिलांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडित एका महिलेने सांगितलं की, चाकणकर बाई स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या. शिवाय, रुपाली चाकणकर यांनी ही विद्या करण्यासाठी स्वत:ची अनामिका कापली होती", असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या हातांवरील बँडेज आणि जखमांचे फोटो दाखवले आहेत. त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

हेही वाचा : अखेर 500 वर्षानंतर योग आलाच! 'या' राशींसाठी प्रगतीचे नवे पर्व सुरु, चतुर्ग्रही राजयोग तुमच्या नशीबात आहे का?

सुषमा अंधारे म्हणाल्या, "मी या तंत्र-मंत्र विद्येबाबत अधिकची  माहिती जाणून घेतली. तेव्हा लक्षात आलं की तंत्र-मंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका महत्त्वाची मानली जाते. मंत्रोच्चोराद्वारे एखाद्याला आकर्षित करुन यशप्राप्ती करणे, असा या तंत्र मंत्र विद्येचा अर्थ आहे. हे सोमवती आमवस्येलाच केले जाते. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती आमवस्या होती. त्यानंतरच्या अनेक फोटोंमध्ये चाकणकरांच्या बोटावर बँडेज आहेत. शिवाय, चाकणकर बाई खरातांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती नाही म्हणतात मात्र, खरातांचे वडिल वारले तेव्हा चाकणकर होत्या. खरात यांच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरात राहते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र मी दोन दिवसात समोर आणेन."

हेही वाचा : नियतीचा क्रूर खेळ! अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, दुधाच्या टँकरने चिरडले

हे वाचलं का?

    follow whatsapp