बोटावर भलंमोठं ड्रेसिंग अन् नंतर बँडेज.., रुपाली चाकणकरांचे 4 फोटो पाहाच; सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे
Sushma andhare on Rupali Chakankar : ठाकरे गटाचे सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या त्यासाठी त्यांनी अनामिका कापली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बोटावर भलंमोठं ड्रेसिंग अन् नंतर बँडेज..,
रुपाली चाकणकरांचे 4 फोटो पाहाच; सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे
Sushma andhare on Rupali Chakankar : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर या स्वतः तंत्र-मंत्र आणि अघोरी विद्या करत असल्याचा खळबळजनक दावा अंधारे यांनी यावेळी केला. ही माहिती नाशिक प्रकरणातील एका पीडितेनेही सांगितल्याचं त्या म्हणाल्या. यशप्राप्तीसाठी आणि वशीकरणासाठी तंत्रमंत्र विद्येमध्ये अनामिका कापली जाते. रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापली होती, असे अंधारे यांनी म्हटले आहे. पुरावा म्हणून त्यांनी चाकणकर यांच्या हातावरील जखमांचे आणि बँडेजचे काही फोटोही माध्यमांसमोर सादर केले असून, हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले.

या तंत्र-मंत्र विद्येबाबत अधिक माहिती देताना अंधारे यांनी तारखांचा संदर्भ दिला. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या होती आणि याच काळात ही अघोरी विद्या करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या तारखेनंतरच्या अनेक फोटोंमध्ये चाकणकर यांच्या बोटावर बँडेज दिसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करून यश मिळवणे हा या विद्येचा उद्देश असतो, असे सांगत त्यांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. स्वतःला सुधारणावादी म्हणवून घेणाऱ्या चाकणकर प्रत्यक्षात अशा तंत्रमंत्र विद्यांचे पालन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

खरात प्रकरणावरून आर्थिक व्यवहारांचे आरोप
दुसरीकडे, खरात यांच्याशी असलेल्या संबंधांवरूनही सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांना धारेवर धरले आहे. खरात यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा चाकणकर यांनी केला होता. मात्र, खरात यांच्या वडिलांच्या निधनावेळी आणि त्यांच्या मुलीच्या लग्नातही चाकणकर उपस्थित होत्या, असा दावा अंधारे यांनी केला. इतकेच नव्हे तर खरात यांची भाची चाकणकर यांच्याच घरात राहत असल्याचे सांगत, त्यांच्यातील जवळच्या संबंधांवर त्यांनी बोट ठेवले आहे. या संदर्भातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.










