चॉकलेट दिले अन् दुकानातच..., दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीसोबत काय केले?
Crime News : एका दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीला दुकानातच आपल्या वासनेची शिकार बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा दुकानदार पीडितेच्या कुटुंबाशी चांगलाच परिचित होता. धक्कादायक म्हणजे यााधीही त्याने चिमुरडीसोबत हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चॉकलेट दिले अन् दुकानातच...
दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीसोबत काय केले?
Crime News : मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपण वाऱ्यावर सोडून दिला आहे काय असे वाटावे अशी घटना समोर आली आहे. निर्भया प्रकरण जगभर गाजल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क होतील, गुन्हेगारांना आळआल बसेल असे वाटले होते. मात्र तसे काही होताना दिसत नाहीये. जिथे निर्भया प्रकरण घडले त्याच दिल्लीतील ही घटना आहे. एका दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीला दुकानातच आपल्या वासनेची शिकार बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा दुकानदार पीडितेच्या कुटुंबाशी चांगलाच परिचित होता. धक्कादायक म्हणजे यााधीही त्याने चिमुरडीसोबत हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : मुलाने 13व्या मजल्यावरून मारली उडी, फ्लॅटमध्ये आईचा कुजलेला मृतदेह.. दुहेरी मृत्यूने सोसायटीत घबराट
दुकानातच केले अत्याचार
पीडित मुलगी आपल्या घराशेजारील शाळेच्या मैदानात लहान बहिणीसोबत खेळत होती. त्याचवेळी तिथे एक दुकान चालवणाऱ्या ओळखीच्या दुकानदाराने तिला बोलण्यात गुंतवून आपल्या दुकानात नेले. दुकानात कोणीही गिऱ्हाईक नसल्याचा फायदा घेत दुकानदाराने चिमुरडीसोबत अश्लील चाळे करत तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. यानंतर त्याने याबद्दल कोणालाही काही न सांगण्यासाठी मुलीला धमकावून तिची भीती घालवण्याचा प्रयत्न केला.
आईला बसला धक्का
या धक्कादायक प्रकारामुळे चिमुरडी प्रचंड घाबरली होती, मात्र तिने धीर एकवटून आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे बोलणे ऐकून आईला मोठा धक्का बसला. पीडितेने सांगितले की, आरोपीने यापूर्वीही तिच्यासोबत असेच गैरवर्तन केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईने तात्काळ आपल्या नातेवाईकांना कळवले आणि कुटुंबासह पोलीस ठाणे गाठून मदतीची मागणी केली.










