बायकोनं भावाच्या साथीने नवऱ्याला संपवलं, मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत, पोस्टमॉर्टममध्ये भलतंच...
Crime news : एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात पत्नीने आणि भावाने मिळून नवऱ्याचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले. दरम्यान, मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून अद्याप संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेनजीकच्या शेतात मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला
मृताच्या बहिणीकडून पोलीस ठाण्यात तक्रार
Crime news : उत्तर प्रदेशातील हरचंदपूर येथे एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात पत्नीने आणि भावाने मिळून नवऱ्याचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले. दरम्यान, मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून अद्याप संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.
हे ही वाचा : बीड : 'तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस' म्हणत सासरच्यांकड़ून छळ, अखेर सुनेनं विष पिऊन संपवलं जीवन
शाळेनजीकच्या शेतात मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला
तरुण बळीराम हा आपली पत्नी अंजूला अतौरा येथील आपल्या सासरच्या घरी घेऊन गेला होता. त्याच दिवशी दुपारी लालगंज-रायबरेली मार्गावरील एका शाळेनजीकच्या शेतात त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला होता.
मृताच्या बहिणीकडून पोलीस ठाण्यात तक्रार
मृत व्यक्तीची बहीण प्रीतीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. वहिणीनेच आपल्या भावाला त्रास दिल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत नमूद केले. प्रीतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वहिणी अंजू आणि तिचा भाऊ विनोदला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
हे ही वाचा : मित्राचे बायकोशी प्रेमसंबंध, नवऱ्याने दोनदा नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडले, तळपायाची आग मस्तकात गेल्याने केला खून
पोलिसांनी सांगितलं की, पुरावे नष्ट करणे आणि खोटी माहिती देणे या कलमांन्वये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास केला जात आहे.










