रुपाली चाकणकरांबाबत सर्वात मोठी बातमी, आता थेट CM फडणवीसांनी...

ऋत्विक भालेकर

Rupali Chakankar Resignation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. अशोक खरात प्रकरणातील दबावामुळे सीएम फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

ashok kharat case as per sources after a brief discussion with cm devendra fadnavis rupali chakankar asked to step down from maharashtra state commission for women post immediately
Rupali Chakankar
social share
google news

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि 'कॅप्टन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला बलात्कार व लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाली आहे. याच अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आल्याने खळबळ माजली आहे. अशोक खरात याच्या चौकशीदरम्यान कोणताही राजकीय दबाव येऊ नये यासाठी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकरांना पदावरून तातडीने पायउतार होण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

नाशिकमध्ये बनावट 'आध्यात्मिक गुरू' अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, वाढता दबाव आणि जनक्षोभामुळे ही घडामोड घडत आहे. या प्रकरणामध्ये चाकणकर आणि ती वादग्रस्त व्यक्ती यांच्यात कथित संबंध असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संक्षिप्त चर्चेनंतर, या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदावरून तातडीने पायउतार व्हावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

नाशिक क्राइम ब्रांचने अशोक खरात याला अटक केली असून, त्याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. हे व्हिडीओ महिलांना गुंगी येणाऱ्या औषध देऊन संमोहित करून तयार केले गेले असून, ब्लॅकमेलिंगसाठी वापरले गेले असल्याचा संशय आहे. प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली असून, IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

हे ही वाचा>> बोटावर भलंमोठं ड्रेसिंग अन् नंतर बँडेज.., रुपाली चाकणकरांचे 4 फोटो पाहाच; सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे

या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याशी निकट संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात चाकणकर यांनी खरात याच्या पायाची पूजा (पाद्यपूजन) करताना, त्यांच्यावर छत्री धरताना आणि विविध कार्यक्रमात एकत्र दिसणारे फोटो आहेत. खरात याच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टमध्ये चाकणकर या विश्वस्त आहेत. विरोधकांनी हे प्रकरण "महाराष्ट्राचे एपस्टिन फाइल" म्हणून संबोधले असून, चाकणकर यांनी खरात यांना राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp