संजयकाका पाटलांनी विधानसभेतील पराभवाचा बदला घेतला, रोहित पाटलांच्या गटाचा तासगाव नगरपालिकेत पराभव

मुंबई तक

Tasgaon Nagarpalika Election Result : विधानसभा निवडणुकीत सलग पराभवाला सामोरे गेलेल्या संजयकाका पाटील यांच्यासाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन पराभवानंतर अखेर तासगावच्या जनतेने संजयकाकांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याने निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

ADVERTISEMENT

Tasgaon Nagarpalika Election Result
Tasgaon Nagarpalika Election Result
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजयकाका पाटलांनी विधानसभेतील पराभवाचा बदला घेतला

point

रोहित पाटलांच्या गटाचा तासगाव नगरपालिकेत पराभव

Tasgaon Nagarpalika Election Result : विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत दमदार पुनरागमन केलं आहे. स्वाभिमानी विकास आघाडीने थेट नगरपालिकेची सत्ता काबीज करत आमदार रोहित पाटील यांच्या गटाला म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. एकूण 24 जागांच्या नगरपालिकेत संजयकाकांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडीचे विजया पाटील विजयी झाल्या.

विधानसभा निवडणुकीत सलग पराभवाला सामोरे गेलेल्या संजयकाका पाटील यांच्यासाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन पराभवानंतर अखेर तासगावच्या जनतेने संजयकाकांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याने निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. दुसरीकडे, आर. आर. आबांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाल्याने त्यांच्या गटात निराशेचं वातावरण आहे.

विजयानंतर संजयकाका पाटील यांनी 'मुंबई तक'शी बोलताना तासगावच्या मतदारांचे आभार मानले. “कुठला पक्ष, चिन्ह किंवा संस्था यांच्याशिवाय केवळ कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकली आहे. जनतेच्या प्रेमावर आणि विश्वासावर आम्ही विजयी झालो असून, यापुढेही तासगावच्या विकासासाठी चांगलं काम करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या विजयामुळे व्यक्तिकेंद्री नेतृत्व आणि स्थानिक विकासकामांवर आधारित राजकारणाला मतदारांनी पसंती दिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : मोहिते पाटील पॅटर्न, राम सातपुतेंचा सुपडा साफ, सोलापुरातील 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे कमळ कोमेजले

हे वाचलं का?

    follow whatsapp