मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

Mumbai News : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरु असताना शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai news
Mumbai news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरु असताना दुर्दैवी घटना

point

मेट्रो स्टेशनचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला

point

दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी

point

देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Mumbai News : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरु असताना एक दुर्दैवी घटना घडली. मेट्रो स्टेशनचा स्लॅब थेट वाहनांवर कोसळला, या  घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले, यापैकी एकाचा अंत झाला. ही घटना शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी घडली असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'x' ट्विटवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी

देवेंद्र फडणवीस यांचं 'X' वरील ट्विट जसंच्या तसं

'मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी', अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अशातच महापौर रितू तावडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया 

'कामासाठी जे इंजिनियर्स ठेवले होते, त्यांनी कामावर लक्ष ठेवलं होतं का? या सगळ्याचीच प्रश्नचिन्हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यापुढील वॉल बसवताना काळजी घेणं गरजेचं आहे, पण आता हे का झालं? याची कारणं आता शोधावी लागणार आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सर्व माहिती देते', असं त्या म्हणाल्या.

'हे एमएमराडीएचं काम असून एक निष्काळजीपणाचे लक्षण आहे. ज्यांनी कोणी संबंधितांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिले, याची माहिती मला मॅडमकडूनच मिळाली की, कालच मॅरिफिट वॉलचे काम करण्यात आले होते. तसेच बॅरिकेट्स इतर सुरक्षिततेचा पाठपुरावा केला की नाही, जर नसेल केला तर रस्त्यावर सुरु असलेली वाहतूक त्यांनी थांबवणे गरजेचे होते'. 

हे वाचलं का?

    follow whatsapp