Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट, तर काही जिल्ह्यांत थंडावा जाणवणार

मुंबई तक

Maharashtra Weather : हवामान विभागाने तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दुपारनंतर उष्णतेत वाढ होईल असा अंदाज देखील बांधला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामान हे कोरडं आणि उष्ण राहण्याची शक्यता

point

जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात 15 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने हवामान हे कोरडं आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता राहणार नाही. हवामान विभागाने तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दुपारनंतर उष्णतेत वाढ होईल असा अंदाज देखील बांधला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा एकूण अंदाज.

हे ही वाचा : रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?

 कोकण : 

कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये वातावरण दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. अशातच IMD विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात कोरडं हवामान राहील. काही प्रमाणात थंडीवा जाणवणार असून दुपारी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता राहील, असा अंदाज आहे. 

मराठवाडा : 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालवना, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे राहील असा अंदाज आहे. 

हे वाचलं का?