मुंबई उच्च न्यायालयाने स्मृती मानधनाच्या मित्राला झापलं, पलाश मुच्छलबाबत मानहानीकारक वक्तव्य करण्यास सक्त मनाई
Palaash muchhal bombay high court smriti mandhana friend vidnyan mane : विज्ञान माने हे स्मृती मानधनाचे बालमित्र आहेत. त्यांनी पलाश मुच्छल यांच्यासोबत एका चित्रपटाचे सह-निर्मितीचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पासाठी मुच्छल यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचा दावा आहे; मात्र आश्वासित रक्कम न दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर मुच्छल आणि मंधाना यांचे लग्न मोडल्याच्या पार्श्वभूमीवर माने यांनी काही मुलाखती दिल्या. त्या मुलाखतींमधील वक्तव्ये मानहानीकारक असल्याचा आरोप मुच्छल यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई उच्च न्यायालयाने स्मृती मानधनाच्या मित्राला झापलं
पलाश मुच्छलबाबत मानहानीकारक वक्तव्य करण्यास सक्त मनाई
Palaash muchhal bombay high court smriti mandhana friend vidnyan mane : मुंबई उच्च न्यायालयाने सांगलीतील चित्रपट निर्माते विज्ञान माने यांना माध्यमांमधील मुलाखती व डिजिटल प्लॅटफॉर्मवर गायक पलाश मुच्छल तसेच त्यांच्या आईविरोधात कथित मानहानीकारक वक्तव्ये करण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा आदेश देताना संबंधित मुलाखतींचा आधार 23 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या घटनेशी जोडला गेला असल्याचे नमूद केले. ही घटना क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि मुच्छल यांचे ठरलेले लग्न नंतर मोडल्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
न्यायालयाने कोणते आदेश दिले?
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पलाश मुच्छल आणि विज्ञान माने यांच्यात व्यावसायिक वाद असताना त्या वैयक्तिक घटनेचा संदर्भ प्रथमदर्शनी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पराग मुच्छल प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माध्यमांमधील मानहानीकारक वक्तव्यांमुळे स्वतःची आणि कुटुंबीयांची प्रतिमा गंभीररीत्या बाधित झाल्याचा आरोप पलाश मुच्छल याने केला होता. तसेच याबाबत कायमस्वरूपी मनाई आदेश व नुकसानभरपाईची मागणी करत तातडीची अंतरिम दिलासा देण्याची विनंतीही करण्यात आली होती, याबाबत पलाश मुच्छल यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता.
विज्ञान माने हे स्मृती मानधनाचे बालमित्र आहेत. त्यांनी पलाश मुच्छल यांच्यासोबत एका चित्रपटाचे सह-निर्मितीचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पासाठी मुच्छल यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचा दावा आहे; मात्र आश्वासित रक्कम न दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर मुच्छल आणि मानधना यांचे लग्न मोडल्याच्या पार्श्वभूमीवर माने यांनी काही मुलाखती दिल्या. त्या मुलाखतींमधील वक्तव्ये मानहानीकारक असल्याचा आरोप मुच्छल यांनी केला आहे.










