'व्याजाचे पैसे न दिल्यास गुप्तांग छाटून टाकेन, तुझ्या बहिणीला...' उल्हासनगरात पैशांवरून अमानुष कृत्य अन् धमकी

मिथिलेश गुप्ता

Ulhasnagar crime : उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते, ते पैसे परत दिले नाही. अशातच पैसे दिलेल्या तरुणाने संबंधित तरुणाला एका लॉजवर नेले आणि त्याला नग्न करून त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला. तो तरुण एवढ्यावरच न थांबता त्याने लिंग छाटून टाकेन अशी देखील धमकी दिली.

ADVERTISEMENT

Ulhasnagar crime
Ulhasnagar crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

'व्याजाचे पैसे न दिल्यास गुप्तांग छाटील, तुझ्या बहिणीला...' पैशांवरून अमानुष कृत्य 

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते, ते पैसे परत देण्यास त्याला विलंब झाल्याच्या कारणावरून आरोपीने संबंधित तरुणाला मारहाण केली. पीडित तरुणाला लॉजवर नेले आणि त्याला नग्न करून अश्लील व्हिडिओ बनवला. तो तरुण एवढ्यावरच न थांबता त्याने 'लिंग छाटून टाकेन' अशी देखील धमकी दिली. जर 'तुला पैसे देणं होत नसेल तर तुझ्या बहिणीला आमच्याकडे पाठवून दे,' असं अमानुष वक्तव्य केलं.

हे ही वाचा : चंद्रपूर : तरुणीचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध अन् लग्न दुसऱ्याशी, प्रियकराने नवऱ्याला 'ते' फोटो पाठवले, नंतर कपडे काढून मारलं

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चिराग मीरचंदानी (वय 30) हे अंबरनाथ पूर्व येथील आश्रय आनंद इमारतीत कुटुंबासह राहतात. त्यांनी आरोपी अमित चागुला याच्याकडून 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी 2 लाख 50 हजार रुपये त्यांनी परत देखील केले होते. वाढत्या व्याजामुळे उर्वरित रक्कम देण्यास विलंब लागेल असं सांगितल्याने आरोपींनी हा कट रचला. 

'व्याजाचे पैसे न दिल्यास गुप्तांग छाटील, तुझ्या बहिणीला...' पैशांवरून अमानुष कृत्य 

9 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरातील एका चायनिज सेंटवर जेवण करताना आरोपींनी लोखंडी पाईपने चिरागला बेदम मारहाण केली. नंतर जबरदस्तीने कारमध्ये बोलावून बदलापूर येथील एका कार्यलयात नेऊन पुन्हा मारहाण करत व्हिडिओ तयार करण्यात आले. पैसे न दिल्यास त्याचे गुप्तांग छाटण्याची धमकी देखील दिली. त्याच्या बहिणीबाबत अश्लील आणि अवमानकारक वक्तव्य करत पैशांची मागणी केली. 

हे ही वाचा : रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?

आरोपींवरुद्ध गुन्हा दाखल 

अखेरीस आरोपीच्या सांगण्यावरून कैलाशनगर परिसरातील एका व्यक्तीकडून 1 लाख 25 हजार रुपये जमा केल्यानंतर चिरागची सुटका करण्यात आली. या प्रकरणात हिल लाईन पोलीस ठाण्यात अमित चागुला, कमला नागदेव आणि त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp