खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा, नेतृत्वात लढलेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ
Dharashiv Nagarpalika Election Result : तुळजापूर नगरपरिषदेत भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्षपदी निवडून आले असून, येथे भाजपने 23 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. नळदुर्गमध्ये भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष झाले असून, येथेही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुरूम नगरपरिषदेत भाजपाचे बापुराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत अध्यक्षपद पटकावले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा
नेतृत्वात लढलेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ
Dharashiv Nagarpalika Election Result : धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका निवडणुकांत त्यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करत बहुतेक ठिकाणी सत्ता मिळवली आहे.
धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकांत भाजप आणि शिंदे गटाने संघटनात्मक ताकद दाखवली. तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरूम येथे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली, तर उमरगा, कळंब आणि परंडा येथे शिवसेना शिंदे गटाने आपली सत्ता कायम राखली. विशेष म्हणजे, भूम नगरपरिषदेत बड्या राजकीय पक्षांना धक्का देत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे.
तुळजापूर नगरपरिषदेत भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्षपदी निवडून आले असून, येथे भाजपने 23 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. नळदुर्गमध्ये भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष झाले असून, येथेही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुरूम नगरपरिषदेत भाजपाचे बापुराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत अध्यक्षपद पटकावले आहे.
शिवसेना शिंदे गटाने उमरगा, कळंब आणि परंडा या नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. उमरग्यात किरण गायकवाड अध्यक्ष झाले असून, शिंदे गटाने येथे 12 जागांवर विजय मिळवला आहे. कळंब नगरपरिषदेत तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी 2,254 मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले. परंड्यातही शिंदे गटाचे जाकीर सौदागर अध्यक्ष झाले आहेत.










