15 तास ओलिस ठेवलं; विवस्त्र व्हिडिओ बनवला, महिलेनं कसं अडकवलं तरुणाला जाळ्यात?

मुंबई तक

Crime News : सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करणं महागात पडू शकतं. इंस्टाग्रामवर एका तरुणाला अशी मैत्री करणं चांगलच अंगलट आलं आहे. इंस्टाग्रामवर या तरुणाची एका मुलीसोबत ओळख झाली. या मुलीने त्याला भेटायला बोलवलं. यानंतर जे घडलं ते सगळंच हादरवून टाकणारं होतं. मध्यप्रदेशातील मैहर येथील ही घटना आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

15 तास ओलिस ठेवलं; विवस्त्र व्हिडिओ बनवला

point

महिलेनं कसं अडकवलं तरुणाला जाळ्यात?

Crime News : सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करणं महागात पडू शकतं. इंस्टाग्रामवर एका तरुणाला अशी मैत्री करणं चांगलच अंगलट आलं आहे. इंस्टाग्रामवर या तरुणाची एका मुलीसोबत ओळख झाली. या मुलीने त्याला भेटायला बोलवलं. यानंतर जे घडलं ते सगळंच हादरवून टाकणारं होतं. मध्यप्रदेशातील मैहर येथील ही घटना आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

हे ही वाचा : कागदोपत्री मेलेला आरोपी भररस्त्यात स्कूटी चालवताना सापडला; 12 वर्षानंतर कसं बाहेर आलं प्रकरण?

इंस्टाग्रामवर ओळख

या घटनेची सुरुवात इंस्टाग्रामवरुन झाली. इंस्टाग्रामवर पीडित तरुणाची ओळख एका तरुणीशी झाली. यानंतर तिने त्याला भेटण्यासाठी मैहर येथील घंटाघर परिसरात बोलावले. तिथे कॉफी हाऊसमध्ये एकत्र नाष्टा केल्यानंतर, तरुणीने त्याला आपल्या घरी सोडण्याची विनंती केली. तरुण तिला घरी सोडायला गेला असता, तिने त्याला पाणी पिण्याच्या बहाण्याने आत बोलावले. तो आत जाताच तिथे आधीच दबा धरुन बसलेल्या तरुणीच्या तीन साथीदारांनी त्याला घेरले आणि मारहाण करायला सुरुवात केली.

15 तास ठेवलं ओलिस

आरोपींनी तरुणाला सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री दीड वाजेपर्यंत ओलीस ठेवले होते. या दरम्यान त्याला बेल्ट, काठ्या आणि लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर, आरोपींनी त्याचे कपडे उतरवून विवस्त्र व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि आरोपींनी तरुणाकडून 'फोन-पे'च्या माध्यमातून 56 हजार रुपये उकळले. तिथून सुटका झाल्यानंतर तरुणाने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.

हे वाचलं का?

    follow whatsapp