कागदोपत्री मेलेला आरोपी भररस्त्यात स्कूटी चालवताना सापडला; 12 वर्षानंतर कसं बाहेर आलं प्रकरण?

मुंबई तक

Crime News : आपल्या देशात प्रशासनाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका व्यक्तीने अटकेपासून वाचण्यासाठी स्वतःला कागदोपत्री मृत घोषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ताराचंद्र शर्मा असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या संदर्भात न्यायालयात खटला सुरु होता. अटकेची शक्यता निर्माण होताच आणि अजामीनपात्र वॉरंट निघाल्यावर, त्याने 2013 मध्ये महानगरपालिकेद्वारे जारी केलेले एक बनावट मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. यानंतर त्याच्यावरील कायदेशीर कारवाई बंद झाली. पण तब्बल 12 वर्षांनंतर त्याचं पितळ उघडं पडलं.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कागदोपत्री मेलेला आरोपी भररस्त्यात स्कूटी चालवताना सापडला

point

12 वर्षानंतर कसं बाहेर आलं प्रकरण?

Crime News : आपल्या देशात प्रशासनाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका व्यक्तीने अटकेपासून वाचण्यासाठी स्वतःला कागदोपत्री मृत घोषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ताराचंद्र शर्मा असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या संदर्भात न्यायालयात खटला सुरु होता. अटकेची शक्यता निर्माण होताच आणि अजामीनपात्र वॉरंट निघाल्यावर, त्याने 2013 मध्ये महानगरपालिकेद्वारे जारी केलेले एक बनावट मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. या प्रमाणपत्रात त्याचा मृत्यू 1998 मध्येच झाल्याचे दाखवण्यात आले होते. या खोट्या कागदपत्राच्या आधारे पोलिसांनीही न्यायालयात चुकीचा अहवाल दिला आणि न्यायालयाने त्याच्याविरुद्धची सर्व कायदेशीर कारवाई बंद केली होती. उत्तरप्रदेशातील आग्रा येथील हे प्रकरण आहे.

हे ही वाचा : गडचिरोली: अबुजमाडच्या जंगलात मोठी चकमक; तीन नक्षलवादी ठार अन् एक जवान शहीद

12 वर्षांनी प्रकरण उघडकीस

जवळपास 12 वर्षे हा आरोपी कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून सर्वसामान्य आयुष्य जगत राहिला. मात्र नोव्हेंबर 2025 मध्ये एका योगायोगामुळे त्याचे पितळ उघडे पडले. या प्रकरणातील फिर्यादी राजकुमार वर्मा यांनी आरोपीला गांधीनगर परिसरात चक्क स्कूटी चालवताना पाहिले. संशय आल्यावर वर्मा यांनी त्याचे फोटो काढले आणि स्कूटीच्या क्रमांकावरून आरटीओ कार्यालयातून माहिती काढली. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की, ज्या आरोपीला न्यायालयाने मृत घोषित केले होते, त्याने 2016 मध्ये आपल्या नावाने नवीन स्कूटीची नोंदणी केली होती आणि तो मोबाईल बँकिंगचाही वापर करत होता. हे सर्व पुरावे गोळा करून फिर्यादीने कोर्टात पुन्हा धाव घेतली.

वडील जीवंत असल्याची वडिलांची कबुली

न्यायालयाच्या आदेशानंतर न्यू आग्रा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली असता  ताराचंद्र शर्मा आपल्या घरात जिवंत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याचे आणि त्याच्या मुलाचे फोटो काढून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले. चौकशीदरम्यान आरोपीच्या मुलानेही कबुली दिली की, त्याचे वडील जिवंत आहेत आणि वृद्धत्वामुळे ते बहुतेक काळ घरातच असतात. पण कधीकधी बाहेर फिरण्यासाठी स्कूटीचा वापर करतात. सुमारे दशकभर स्वतःचा मृत्यू भासवून न्यायव्यवस्थेची थट्टा करणाऱ्या या आरोपीचे सत्य आता चव्हाट्यावर आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp