Black Box म्हणजे काय? अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपास प्रक्रियेत किती महत्त्वाचा?
Ajit Pawar Plane Crash What is Black Box : फ्लाईट डेटा रिकॉर्डर आणि वैमानिकांच्या कॉकपिटमधील आवाज जतन करणाऱ्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या प्रवासातील संपूर्ण तांत्रिक माहिती यात नोंदवली जाते. ही सर्व माहिती डिजीटल स्वरूपात रेकॉर्ड होत असते. विशेष म्हणजे ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसून केशरी रंगाचा असतो. अपघातानंतर सहज सापडावा यासाठी तो विमानाच्या मागील भागात बसवण्यात येतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Black Box म्हणजे काय?
अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात किती महत्त्वाचा?
Ajit Pawar Plane Crash What is Black Box : महाराष्ट्रातील दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात ‘ब्लॅक बॉक्स’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. अपघातानंतर विविध दावे-प्रतिदावे, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता संपूर्ण तपासाची दिशा ब्लॅक बॉक्सच्या डेटाकडे वळली आहे. आमदार अमोल मिटकरी आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेले आक्षेप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे एकामागून एक दावे यामुळे या प्रकरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?
फ्लाईट डेटा रिकॉर्डर आणि वैमानिकांच्या कॉकपिटमधील आवाज जतन करणाऱ्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या प्रवासातील संपूर्ण तांत्रिक माहिती यात नोंदवली जाते. ही सर्व माहिती डिजीटल स्वरूपात रेकॉर्ड होत असते. विशेष म्हणजे ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसून केशरी रंगाचा असतो. अपघातानंतर सहज सापडावा यासाठी तो विमानाच्या मागील भागात बसवण्यात येतो.
ब्लॅक बॉक्समधून काय सापडू शकतं?
ब्लॅक बॉक्समधून एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत वैमानिकांचे झालेले संभाषण, अपघाताच्या वेळी विमानात नेमकं काय घडलं होतं, दुर्घटनेसाठी कोणती कारणं जबाबदार ठरली, अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे, याची माहिती मिळू शकते. याशिवाय कुठली उपकरणं बंद पडली होती का, हवामानाची स्थिती, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाचा वेग, उंची, दिशा, इंधनसाठ्याची माहिती आणि बिघाडानंतर विमानात नेमकं काय घडलं, हे सर्व तपशील ब्लॅक बॉक्समधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दादांच्या तपासात ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा कसा?










