आमदार अतुल भोसले अन् पृथ्वीराज चव्हाण दोघांच्याही गटांचा कराड नगरपालिकेत पराभव, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Karad Nagarpalika elections Results : नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी) यांना 24,096 मते मिळाली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांना 14,361 अपक्ष रणजीतनाना पाटील यांना 6651, काँग्रेसचे झाकीर पठाण यांना 2309, अपक्ष गणेश कापसे यांना 453, बापू लांडगे यांना 126 मते मिळाली, तर 268 मतदारांनी नोटाचा वापर केला.

ADVERTISEMENT

Karad Nagarpalika Election Result
Karad Nagarpalika Election Result
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार अतुल भोसले अन् पृथ्वीराज चव्हाण दोघांच्याही गटांचा कराड नगरपालिकेत पराभव

point

नगराध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाच्या राजेंद्रसिंह यादव यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला

Karad Nagarpalika elections Results : कराड नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम निकालाने शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप आमदार अतुल भोसले या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गटांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला असून नगराध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाच्या राजेंद्रसिंह यादव यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. यादव यांनी तब्बल 9735 मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी) यांना 24,096 मते मिळाली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांना 14,361 अपक्ष रणजीतनाना पाटील यांना 6651, काँग्रेसचे झाकीर पठाण यांना 2309, अपक्ष गणेश कापसे यांना 453, बापू लांडगे यांना 126 मते मिळाली, तर 268 मतदारांनी नोटाचा वापर केला.

या निकालामुळे कराडमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची मोठी पीछेहाट झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रभावाखालील काँग्रेस गट अपेक्षेपेक्षा खूपच मागे राहिला, तर आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपलाही नगराध्यक्षपदावर आपली पकड कायम ठेवता आली नाही. स्थानिक पातळीवर मतांचे विभाजन, आघाड्यांचे राजकारण आणि अपक्ष उमेदवारांची ताकद यामुळे हे चित्र निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : घायल हू इसलिये घातक हूं, भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर मोहिते पाटलांची 'धुरंदर' डायलॉगबाजी अन् डान्स VIDEO

हे वाचलं का?

    follow whatsapp