घायल हू इसलिये घातक हूं, भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर मोहिते पाटलांची 'धुरंदर' डायलॉगबाजी अन् डान्स VIDEO
Dhairyasheel Mohite Patil dance Video and Dhurandar dialogue : अकलूज नगरपरिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला होता. मात्र निकालाच्या दिवशी मोहिते पाटील गटाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं. या विजयानंतर भाजपवर आरोप करताना धुरंदर सिनेमातील डायलॉग वापरून खासदार मोहिते पाटलांनी राजकीय संदेश दिला. त्यामुळे अकलूजच्या राजकारणात सिनेमी स्टाईल चर्चा रंगताना दिसत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"घायल हू इसलिये घातक हूं"
भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर मोहिते पाटलांची 'धुरंदर' डायलॉगबाजी अन् डान्स VIDEO
Dhairyasheel Mohite Patil dance Video and Dhurandar dialogue : नगरपालिका निवडणुकीनंतर अकलूजच्या राजकारणात सध्या ‘धुरंदर’ सिनेमाची क्रेझ चांगलीच पाहायला मिळत आहे. भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधताना “घायल हू… इसलिये घातक हूं…” असा धुरंदर सिनेमातील गाजलेला डायलॉग मारला. यावेळी त्यांनी केलेली डायलॉगबाजी आणि जल्लोषातील डान्सचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अकलूज नगरपरिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला होता. मात्र निकालाच्या दिवशी मोहिते पाटील गटाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं. या विजयानंतर भाजपवर आरोप करताना धुरंदर सिनेमातील डायलॉग वापरून खासदार मोहिते पाटलांनी राजकीय संदेश दिला. त्यामुळे अकलूजच्या राजकारणात सिनेमी स्टाईल चर्चा रंगताना दिसत आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील या निकालांवर आमदार उत्तम जानकर यांनीही जोरदार टीका केली. “या निकालाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू नये, असाच संदेश दिला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. उत्तम जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना सांगितलं की, “भाजपने अकलूजमध्ये मताला 30 हजार रुपये वाटले, तरीही त्यांचा पराभव झाला.” तसेच “जिथं सेंटिंग नाही, तिथं भाजप नाही,” असा हल्लाबोल करत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मोहिते पाटलांच्या पट्ट्यात कमळ पूर्णपणे कोमेजल्याचं चित्र असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.










