साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!

इम्तियाज मुजावर

सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. साताऱ्यातील 'हॉटेल फर्न'मध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची औपचारिक बैठक पार पडली.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!
राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'

point

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!

Satara ZP: सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. साताऱ्यातील 'हॉटेल फर्न'मध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची औपचारिक बैठक पार पडली, ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. 

दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित

जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर  ही बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. 

हे ही वाचा: एकीकडे एकत्र येण्याची जोरदार चर्चा अन् दुसरीकडे पवारांच्या खासदारांची दिल्लीत भलतीच खेळी!

सत्तास्थापने संदर्भात सकारात्मक संकेत

जिल्हा परिषदेचा कौल पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे सत्तेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ असल्यामुळे स्थानिक राजकारणात भाजपचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री मकरंद पाटील यांनी "जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ही केवळ प्राथमिक चर्चा असल्याचे स्पष्ट केले असून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनीही सत्तास्थापने संदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी एकत्र येत साताऱ्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने गुप्त बैठका घेतल्या जात आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp