एकीकडे एकत्र येण्याची जोरदार चर्चा अन् दुसरीकडे पवारांच्या खासदारांची दिल्लीत भलतीच खेळी!

मुंबई तक

Loksabha speaker no confidence motion : एकीकडे महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा असताना दिल्लीत एक वेगळीच घटना पहायला मिळाली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्या असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके, अमर काळे आणि भास्कर भगरे या तिघांनी अविश्वास ठरावार स्वाक्षरी केली आहे. यामुळे् राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ADVERTISEMENT

Loksabha speaker no confidence motion
Loksabha speaker no confidence motion
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकीकडे एकत्र येण्याची जोरदार चर्चा

point

दुसरीकडे पवारांच्या खासदारांची दिल्लीत भलतीच खेळी!

Loksabha speaker no confidence motion : एकीकडे महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा असताना दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी एक वेगळीच खेळी केल्याचे पहायला मिळाले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्या असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके, अमर काळे आणि भास्कर भगरे या तिघांनी अविश्वास ठरावार स्वाक्षरी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेत न येण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : रोहित पवारांचे एका मागोमाग एक भयंकर गौप्यस्फोट, 'अजितदादांचा अपघात नाही तर...'

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदांरांच्या सह्या

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींना राष्ट्रपती अभिभाषणावरील आभार प्रदर्शानात बोलू न दिल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. यावर जवळपास ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी देखील यावर स्वाक्षऱ्या केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अविश्वास प्रस्तावावर निलेश लंके, अमर काळे आणि भास्कर भगरे या शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्या आहेत. राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनि‍करणाची चर्चा असतानाच शरद पवार गटाच्या खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

अविश्वास प्रस्ताव कशासाठी?

संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याचा मुद्दा आधार मानून विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव अनुच्छेद 94 (सी) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्त्वात या प्रस्तावाची सूचना दाखल करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp