बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, घुग्घुश शहरात त्रिशूल मोर्चा; नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu chandrapur speech : चंद्रपुरातील घुग्घुस येथे त्रिशूल आंदोलनाच्या समारोपावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांवर टीका केली. पोलीस प्रकल्पग्रस्त आंदोलकांना त्रास देत असल्याचा आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून पैसे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ
घुग्घुश शहरात त्रिशूल मोर्चा; नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu chandrapur speech : शिवसेना (शिंदे गट) आमदार बच्चू कडू यांनी चंद्रपुरात पोलिसांवर टीका करत त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस प्रकल्पग्रस्त आंदोलकांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील कोळसा क्षेत्रामुळे प्रभावित गावांमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी त्रिशूल आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात असलेल्या पैनगंगा कोळसा खाण परिसरातून घुग्घुस शहरातील कारगिल चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सहभागी होत बच्चू कडू यांनी सुमारे 15 किलोमीटर पायी प्रवास केला. त्यानंतर घुग्घुस शहरातील कारगिल चौकात मोर्चाचा समारोप झाला. यावेळी झालेल्या भाषणात बच्चू कडू यांनी पोलिसांवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा : बारामती विमानतळाजवळ शिपिंग कंपनीच्या मालकावर हल्ला, फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने आले अन्...
पोलीस वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून पैसे घेत असल्याचा आरोप
बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात पोलीस वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. तसेच, प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलीस धमकावत असल्याचा दावाही त्यांनी केला. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी आक्रमक भाषेत टीका केली. या भाषणादरम्यान बच्चू कडू यांनी पोलिसांसाठी अपशब्द वापरले. प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि ठाणेदार यांचा उल्लेख करत त्यांनी काही पोलिसांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी विनाकारण कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास त्यांना जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणातून मांडला.
पोलिसांच्या कथित दादागिरीवरही टीका
भाषणात बच्चू कडू यांनी पोलिसांच्या कथित दादागिरीवरही टीका केली. एखाद्या ठाणेदाराने विनाकारण कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास संबंधित अधिकाऱ्याला पाहून घेण्याचा इशारा त्यांनी दिला. या वेळी त्यांनी पोलिसांना उद्देशून आक्रमक शब्दांचा वापर केला. प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या समारोपावेळी केलेल्या या भाषणामुळे बच्चू कडू चर्चेत आले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना धमकावले जात असल्याचा आरोप करत त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, त्यांच्या भाषणातील पोलिसांविषयीच्या अपशब्दांमुळे हा प्रकार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
