एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics : मिळालेल्या माहितीनुसार, गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी एकनाथ खडसे सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आणि अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गृहमंत्र्यांबाबतही अपशब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल
नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना अर्वाच्य भाषेत अरेरावी केल्याचा तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्या विरोधातील फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा स्वतः पोलिसांनी फिर्याद देत नोंदवला आहे.
पोलीस आणि गृहमंत्र्यांबाबतही अपशब्द वापरल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी एकनाथ खडसे सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आणि अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गृहमंत्र्यांबाबतही अपशब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
एकनाथ खडसे यांच्याकडून आरोपांचे खंडन
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. आपण केवळ गौण खनिज प्रकरणासंदर्भात माहिती विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संभाषणादरम्यान पोलीस निरीक्षकांबाबत चुकीने एक शब्द उच्चारला गेला असल्याचे मान्य करत त्याबद्दल आपण तात्काळ माफीही मागितल्याचा दावा त्यांनी केला आहे.










