सातारा जिल्ह्यात पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या! मृतदेहाशेजारी बसून 191 किमी प्रवास, पोलीस दलातील हवालदाराचं कांड
Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुहडे गावात विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या करून मृतदेह तब्बल 191 किमी अंतर कारमधून प्रवास करत साताऱ्यात एका विहिरीत आणून फेकला. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा नवी मुंबई पोलीस दलातील हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात धक्कादायक प्रकार
मृतदेह शेजारीच ठेवून तब्बल 191 किमीचा प्रवास
Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुहडे गावात विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या करून मृतदेह तब्बल 191 किमी अंतर कारमधून प्रवास करत साताऱ्यात एका विहिरीत आणून फेकला. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा नवी मुंबई पोलीस दलातील हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : खाकी वर्दीला बट्टा! महिला कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचे अश्लील व्हिडिओ, दोघेही निलंबित
स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी अवघ्या काहीच तासांमध्ये या हत्येचा खुलासा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील सुहडे गावातील शेतविहिरीत अंदाजे वय वर्षे 25 ते 30 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. लोणंद पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा पुढील तपास केला.
घटनास्थळी पाहणी करताना हा अपघात नसून खूनामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आला. या प्रकरणात पोलीस तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाच्या सुचना दिल्या आहेत. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहने आणि संशयावरून बारकाईने तपास केला.
मृतदेह शेजारीच ठेवून तब्बल 191 किमीचा प्रवास
तपासादरम्यान एक संशयित कार ही पोलिसांच्या रडारवर आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करून गुन्हेगारांचा तपास केला आहे. तपासातून समोर आले की, आरोपीने संबंधित तरुणाचे हातपाय बांधून त्याला कारमध्ये बसवले. नंतर त्याचा खून करण्यात आला. मृतदेह शेजारीच ठेवून तब्बल 191 किमीचा प्रवास केला, नंतर सुहाडे गावातील विहीरीजवळ मृतदेह टाकण्यात आला होता.










