खाकी वर्दीला बट्टा! महिला कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचे अश्लील व्हिडिओ, दोघेही निलंबित

मुंबई तक

crime news : एका महिला कॉन्स्टेबलचे आणि एका हेड कॉन्स्टेबलचे इंटिमेंट व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झालेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. व्हिडिओत एसपी आणि महिला कॉन्स्टेबल हे वर्दीत दिसत आहेत.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

महिला कॉन्स्टेबलचे आणि एका हेड कॉन्स्टेबलचे इंटिमेंट व्हिडिओ

point

संबंधित व्हिडिओत महिला अधिकारी पोलिसांच्या वर्दीत

Crime News : महिला कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचे इंटिमेंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनं आता सुरक्षा दलावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एसपी आणि महिला कॉन्स्टेबल या उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील रेहाड पोलीस ठाण्यात आपली नोकरी करत होते. संबंधित व्हिडिओत महिला ही पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीत दिसत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

हे ही वाचा : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच, बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, 1600 मीटर धावताना आली भोवळ

खाकी वर्दीला बट्टा 

खाकी वर्दीला लाज आणणाऱ्या घटनेनं पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंद खोलीतील हे प्रकरण उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, लोकांनी पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हेड कॉन्स्टेबल आणि महिला हेड कॉन्स्टेबल निलंबित

संबंधित व्हिडिओ हा बिजनौरच्या एसपी अभिषेक झा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळपने कारवाई केली आणि आरोपी हेड कॉन्स्टेबल तसेच महिला हेड कॉन्स्टेबलला निलंबित केलं. या प्रकरणाचा शोध सुरु असून एसपींनी संबंधित व्हिडिओ कुठे शूट केले याचा शोध घेतला. 

हे ही वाचा : युट्यूबर तरुणीने वडिलांवर विळ्याने हल्ला करत संपवलं, हादरवून टाकणारा धक्कादायक प्रकार

दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर कोणी व्हायरल केले? यामागील त्याचा मुख्य हेतू काय? अशा प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. एसपींनी सांगितलं की, विभागात शिस्त असणं गरजेचं आहे. अशा लज्जास्पद कृत्यांना कोणत्याही किंमतीत खपवून घेतलं जाणार नाही.
 

हे वाचलं का?