युट्यूबर तरुणीने वडिलांवर विळ्याने हल्ला करत संपवलं, हादरवून टाकणारा धक्कादायक प्रकार

मुंबई तक

crime news : एका गावात तरुणीने तिच्याच वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी तरुणी ही युट्यूबर असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीने वडिलांच्या तोंडावर केला विळ्याने हल्ला

point

वडिलांचे बायको आणि मुलीच्या चारित्र्यावर संशय 

Crime News : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एक खळबळजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. हरदी बाजार पोलीस ठाणे हद्दीतील रलिया या गावात तरुणीने तिच्याच वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी तरुणी ही युट्यूबर असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : 42 वर्षीय पुरुषाचा पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने बायकोच्या मित्राला जागीच संपवलं

मुलीने वडिलांच्या तोंडावर केला विळ्याने हल्ला

संबंधित घटना सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री 2 ते 2:30 च्या दरम्यान घडल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक केवट हे रलिया गावातील रहिवासी हे त्यांच्या घरात झोपले होते. त्यांची मुलगी गीता केवटने आपल्याच वडिलांच्या तोंडावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. 

वडिलांचे बायको आणि मुलीच्या चारित्र्यावर संशय 

वृत्तानुसार, गीता ही आपल्या आई आणि बहीण हे वडिलांपासून दूर राहायचे. तिचे वडील अशोक केवट हे गावात एकटेच राहू लागले होते. मृत वडील वारंवार बायको आणि मुलीच्या चारित्र्यावरून संशय व्यक्त करत असल्याचा आरोप होता. यामुळेच कुटुंबात मोठा तणाव निर्माण झाला होता. गीता ही जात आणि रहिवासी दाखला घेण्यासाठी गावात आली होती आणि नंतर ती तिच्या आजोबांच्या घरी राहू लागली होती, याचदरम्यान तिने हे कृत्य केलं. 

हत्येनंतर गीता घराबाहेर पडली आणि तिने त्याच्या नातेवाईकांना सांगितलं की मीच आपल्या वडिलांची हत्या केली. मृताचा भाऊ संतोष कुमार हा घरात गेला असता, अशोक केवट रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp