42 वर्षीय पुरुषाचा पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने बायकोच्या मित्राला जागीच संपवलं
Crime News : गोकुळपुरी येथे एका 42 वर्षीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त करत मारहाण केली. याच मारहाणीत संबंधित प्रियकराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे नाव गौरी शंकर यादव असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रवीने महिलेला दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवल्या
आरोपी गौरी शंकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Crime News : दिल्लीतील गोकुळपुरी येथे एका 42 वर्षीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त करत मारहाण केली. याच मारहाणीत संबंधित प्रियकराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे नाव गौरी शंकर यादव असे आहे. तसेच मृत व्यक्तीचे नाव रवी कुमार (वय 28) असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!
आरोपी गौरी शकंर यादव हे उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या घटनेचा घटनाक्रम सांगितला. रवी हा तिचा अगदी जवळचा मित्र होता, त्याचदरम्यान गौरी शंकर यादव वाईट प्रसंगाचा सामना करत होता. जवळजवळ 10 महिन्यांपूर्वी आरोपी गौरी शंकर यादवची प्रकृती स्थिर बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
रवीने महिलेला दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवल्या
त्याचदरम्यान रवीने महिलेला दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवण्याचे काम केले. एवढंच नाहीतर महिलेनं आपल्या मुलांच्या पोटापाण्यासाठी गोकुलपुरी येथे एक फुड स्टॉल सुरु केला होता. जवळजवळ एक महिन्यापूर्वी, जेव्हा तिला घराच्या संकटाचा सामना करावा लागला, तेव्हा रवीने तिला एक खोली भाड्याने देण्यास मदत केली आणि त्या ठिकाणी ती आपल्या मुलीसोबत तिथेच राहू लागली होती.
7 फेब्रुवारी रोजी गौरी शंकर यादव सुरतहून दिल्लीला परतले तेव्हा घटनेला एक वेगळं वळण प्राप्त झालं. घरात रवीची उपस्थिती अस्वस्थ करु लागली, तो त्याच्या पत्नीशी रवीच्या नातेसंबंधावरून वाद घालू लागला होता. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.










