धडकी भरवणारा 'एनर्जी लॉकडाउन' भारतात होणार लागू? काय खरं काय खोटं.. नेमकं घ्या समजून!

मुंबई तक

World Energy Lockdown: अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर 'एनर्जी लॉकडाउन' हा शब्द ऑनलाइन ट्रेंड होत आहे. चला जाणून घेऊया याचविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

what is an energy lockdown people are debating on social media to conserve oil and gas energy lockdown  be imposed in india what true what false
Energy Lockdown (प्रातिनिधिक फोटो)
google news

मुंबई: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात एक नवीन शब्द वेगाने लोकप्रिय होत आहे. तो म्हणजे एनर्जी लॉकडाउन. (Energy Lockdown) जग पुन्हा एकदा कोविड-19 सारख्या परिस्थितीकडे जात आहे का? असा सवाल सोशल मीडियावरील लोक विचारत आहेत.

पण, अद्याप कोणत्याही देशाने अधिकृतपणे 'एनर्जी लॉकडाउन' जाहीर केलेला नाही. हा शब्द इंटरनेट आणि सोशल मीडिया यूजर्सने तयार केला आहे आणि सध्याच्या ऊर्जा संकटाचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत ज्यात लोक या शब्दाचा उल्लेख करत आहेत.

'एनर्जी लॉकडाउन' म्हणजे काय?

खरं तर, 'एनर्जी लॉकडाउन'ची कोणतीही निश्चित व्याख्या नाही. जेव्हा सरकार आणि समाज मर्यादित ऊर्जा संसाधनांचे जतन करण्यासाठी वापर आणि हालचालींवर निर्बंध लादतात, तेव्हा हा शब्द वापरला जातो.

हे ही वाचा>> मोठी बातमी... LPG सिलेंडर बुकिंगसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, 'हा' नियम तुम्हीही पाहा; नाहीतर...

इराण आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. जगातील सुमारे 20% तेलाच्या वाहतुकीसाठी हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

हे वाचलं का?