झिरवाळांच्या Video प्रकरणावर CM फडणवीसांचं मोठं विधान.. म्हणाले, 'तर कारवाई होईलच!'
Narhari Zirwal Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशावेळी या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (27 मार्च) मोठं विधान केलं आहे. झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की, 'असं आहे की, नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवरून संपर्क साधत मला असं सांगितलं की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी.' पण याचविषयी पुढे मुख्यमंत्री असंही म्हणाले की, 'जे काही व्हिडिओ समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं आहे.
झिरवाळांच्या Video बाबत नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
'असं आहे की, नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवरून संपर्क साधत मला असं सांगितलं की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू.'
हे ही वाचा>> 'तो' तृतीयपंथी अनेकांना भेटायचा.. झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
'असं आहे की, मागच्या काळात जी घटना (लाच प्रकरण) घडली त्याची पूर्ण चौकशी झाली. त्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे.. जे काही व्हिडिओ समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच.'
त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील पावले उचलली जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.









