रावसाहेब दानवेंना मोठा झटका, भोकरदनच्या नगरपालिकेत पराभव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दानवेंच्या घरासमोर जल्लोष

मुंबई तक

Bhokardan Nagarpalika Election Result : भोकरदन नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, ती प्रतिष्ठेची आणि राजकीय ताकद मोजणारी लढत बनली होती. भाजपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती.

ADVERTISEMENT

Bhokardan Nagarpalika Election Result
Bhokardan Nagarpalika Election Result
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रावसाहेब दानवेंना मोठा झटका

point

भोकरदनच्या नगरपालिकेत पराभव

point

राष्ट्रवादीचा दानवेंच्या घरासमोर जल्लोष

Bhokardan Nagarpalika Election Result : जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने मोठा राजकीय धक्का देत नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार मिर्झा समरिन यांनी भाजपच्या उमेदवार आशा माळी यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच आमदार संतोष दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

भोकरदन नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, ती प्रतिष्ठेची आणि राजकीय ताकद मोजणारी लढत बनली होती. भाजपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. रावसाहेब दानवे यांचा भोकरदन हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील नगराध्यक्ष पद भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, मतदारांनी भाजपला नाकारत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला स्पष्ट कौल दिला.

हेही वाचा : नितेश राणेंना मोठा झटका, कणकवली अन् मालवण नगरपालिकेत पराभव; निलेश राणेंनी मैदान मारलं

निवडणूक निकाल जाहीर होताच भोकरदनमध्ये राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार जल्लोष केला. यावेळी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp