65 वर्षीय वकील महिलेचा घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह! भयानक घटनेने पोलिसही चक्रावले...

मुंबई तक

एका ज्येष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण संशयास्पद आहे. कारण, घरात मृतदेह सापडल्याने बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.

ADVERTISEMENT

अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह!
अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

65 वर्षीय वकील महिलेचा घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह!

point

भयानक घटनेने पोलिसही चक्रावले...

Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाटणा उच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. कदम कुआन परिसरातील पीडितेच्या घरात तिचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव इंदिरा लक्ष्मी असून ती पाटणा हायकोर्टात वरिष्ठ महिला वकील होती. पीडित महिला कदम कुआं पोलीस स्टेशन हद्दीतील राजेंद्र नगरच्या रोड नंबर-2 येथे राहत होती. बुधवारी इंदिरा लक्ष्मीचा मृतदेह तिच्या घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. आता पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिली माहिती... 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता इंदिरा लक्ष्मी या जवळपास 60 वर्षांच्या होत्या. त्या पाटणा उच्च न्यायालय आणि दिवाणी न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या. तसेच, त्या कायदेशीर क्षेत्रातही सक्रिय होत्या. इंदिरा लक्ष्मी घरात एकट्या राहत होत्या आणि  त्यांचे पती झारखंडचे राजधानी रांची येथे राहत होते. महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळल्याची माहिती मिळताच, कदम कुआं पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल टीमही घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण संशयास्पद आहे. कारण, घरात मृतदेह सापडल्याने बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे ही वाचा: महाराष्ट्रातलं असं एक गाव जिथं आंतरजातीय विवाह थाटात लावले जाणार! 'जातमुक्ती'साठी ऐतिहासिक निर्णय

पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून मृताच्या कुटुंबाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत पोलीस निवेदन प्रसिद्ध झालेलं नाही. आता, वकील इंदिरा लक्ष्मी याचा अपघात झाला की त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला? याचा पोलीस शोध घेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp