नितेश राणेंना मोठा झटका, कणकवली अन् मालवण नगरपालिकेत पराभव; निलेश राणेंनी मैदान मारलं

मुंबई तक

Kankavli and Malvan Nagarpalika Election Result : दुसरीकडे कणकवली नगरपालिकेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी अवघ्या 145 मतांच्या फरकाने विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. एकूण जागावाटपात भाजपने 9 जागांवर विजय मिळवला असला, तरी शहर विकास आघाडीने 8 जागांवर यश संपादन करत भाजपला कडवी टक्कर दिली आहे.

ADVERTISEMENT

Kankavli and Malvan Nagarpalika Election Result
Kankavli and Malvan Nagarpalika Election Result
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नितेश राणेंना मोठा झटका

point

कणकवली अन् मालवण नगरपालिकेत पराभव

point

निलेश राणेंनी मैदान मारलं

Kankavli and Malvan Nagarpalika Election Result : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण नगरपरिषद निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री नितेश राणेंना या निवडणुकांत मोठा धक्का बसला असताना, दुसरीकडे निलेश राणेंनी मालवणचा गड कायम राखत आपली ताकद सिद्ध केली आहे.

मालवण नगरपरिषदेच्या एकूण 20 जागा आणि नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी विजय मिळवला असून शिंदे गटाने एकूण 10 जागांवर यश संपादन केले आहे. भाजपला 5 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निकालामुळे मालवणमध्ये निलेश राणेंचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामुळे मालवणमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग शिंदे गटासाठी सोपा झाला आहे.

दुसरीकडे कणकवली नगरपालिकेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी अवघ्या 145 मतांच्या फरकाने विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. एकूण जागावाटपात भाजपने 9 जागांवर विजय मिळवला असला, तरी शहर विकास आघाडीने 8 जागांवर यश संपादन करत भाजपला कडवी टक्कर दिली आहे. अत्यल्प मतफरकामुळे कणकवलीतील आगामी सत्तास्थापनेबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या निकालांमुळे पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कणकवली आणि मालवण या दोन्ही ठिकाणी त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. विशेषतः कणकवलीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नितेश राणेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp