कांद्याच्या पिकात अफूची लागवड, उपतालुका प्रमुखाचा प्रताप समोर येताच ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय
Dharashiv Politics : समाधान उघडे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या शिस्तीला गंभीर धक्का बसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कधीही थारा दिला जाणार नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कांद्याच्या पिकात अफूची लागवड
उपतालुका प्रमुखाचा प्रताप समोर येताच ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय
Dharashiv Politics धाराशिव, गणेश जाधव : वाशी तालुक्यातील ठाकरेंच्या उपतालुका प्रमुखाने शेतातील कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता अफू लागवड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपतालुका प्रमुख समाधान मनोहर उघडे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. बेकायदेशीर प्रकारला पाठिंबा देणार नाही, असा ठाम संदेश ओमराजे निंबाळकर यांनी कृतीतून दिलाय.
ओमराजे निंबाळकर त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले?
समाधान उघडे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या शिस्तीला गंभीर धक्का बसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कधीही थारा दिला जाणार नाही. त्यामुळे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर यापूर्वी मुंबई तक या वृत्तवाहिनीवर सविस्तर बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्या बातमीत अफू लागवडीची संपूर्ण घटना मांडत ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधण्यात आले होते. या वृत्तानंतर राजकीय हालचालींना वेग आला आणि त्यानंतर थेट पक्षांतर्गत कठोर कारवाई झाल्याने या निर्णयाचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे.
हेही वाचा : आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली; अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा










