आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली; अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा
Crime News : काही महिन्यांपूर्वी आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूची सबंध देशभरात चर्चा रंगली होती. तिच सासू आता जावयाला सोडून आपल्या मेहुण्यासोबत पळून गेली आहे. यामुळे पुन्हा एकदी ही महिला चर्चेत आली आहे. यानंतर जावई सासूविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. पण पोलिसांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या स्वप्नांचा भंग झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली
अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा
Crime News : काही महिन्यांपूर्वी आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूची सबंध देशभरात चर्चा रंगली होती. तिच सासू आता जावयाला सोडून आपल्या मेहुण्यासोबत पळून गेली आहे. यामुळे पुन्हा एकदी ही महिला चर्चेत आली आहे. यानंतर जावई सासूविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. पण पोलिसांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या स्वप्नांचा भंग झाला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगडमधील ही महिला आहे. नात्यांना काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस आणि कुटुंबीय दोन्ही चक्रावून गेले आहेत. अनिता असं या महिलेचं नाव आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातलं असं एक गाव जिथं आंतरजातीय विवाह थाटात लावले जाणार! 'जातमुक्ती'साठी ऐतिहासिक निर्णय
होणाऱ्या जावयासोबत गेली पळून
या विचित्र कथेची सुरुवात अलीगडमधील मडराक परिसरातून झाली. येथे एका कुटुंबात मुलीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि 16 एप्रिल 2025 ही लग्नाची तारीख निश्चित झाली होती. मात्र, लग्नापूर्वीच मुलीची आई अनिता हिचे तिचे होणारे जावई राहुल याच्याशी सूत जुळले. दोघेही तासनतास फोनवर बोलू लागले. कुटुंबियांनी यावर आक्षेप घेतला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर लग्नाच्या अवघ्या 12 दिवस आधी अनिता घरातील रोकड आणि दागिने घेऊन राहुलसोबत फरार झाली. पोलिसांनी त्यांना शोधून आणले, पण दोघेही सज्ञान असल्याने आणि अनिताने राहुलसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने पोलीस काहीही करू शकले नाहीत.
मेहुण्यासोबत गेली पळून
राहुल आणि अनिता बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील एका गावात जाऊन एकत्र राहू लागले. तिथे राहुल कपडे विकून आपला उदरनिर्वाह करत होता. सर्व काही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच या कथेत पुन्हा एक नाट्यमय वळण आले. राहुलने अलीगड गाठून पोलिसांत तक्रार दिली की, अनिता आता त्यालाही सोडून आपल्या मेहुण्यासोबत पळून गेली आहे. राहुलच्या दाव्यानुसार, जाताना अनिताने दोन लाख रुपयांची रोकड आणि दागिने देखील सोबत नेले आहेत.










