सुनेवर वेश्या व्यवसायासाठी दबाव, सासर की दलालांचं घर? सुनेनं घेतला टोकाचा निर्णय
Crime News : 22 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या करण्यामागचे कारण हादरवून टाकणारे आहे. तिच्या सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात जाण्यासाठी जबरदस्ती केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुनेवर वेश्या व्यवसायासाठी दबाव
सासर की दलालांचं घर?
Crime News : 22 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या करण्यामागचे कारण हादरवून टाकणारे आहे. तिच्या सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात जाण्यासाठी जबरदस्ती केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. अंजनाबाई पाटील असं मृत महिलेचं नाव असून कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : मोठ्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय... पोलिसांनी छापा टाकताच तब्बल 11 महिलांना घेतलं ताब्यात
लग्नानंतर दोन वर्षांतच आयुष्याचा अंत
अंजनाबाईचा विवाह 2022 मध्ये शेखर पाटील याच्याशी झाला होता. शेखर हा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. या दांपत्याला 11 महिन्यांची एक लहान मुलगी देखील आहे. सुखी संसार सुरु असतानाच अचानक अंजनाबाईने टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप
मृत महिलेचे वडील विजयकुमार यांनी दिलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सासरच्या मंडळींकडून अंजनाबाईचा केवळ मानसिक छळच केला जात नव्हता, तर तिला वेश्या व्यवसायासाठी देखील भाग पाडले जात होते. या अनैतिक मागणीला अंजनाबाईचा विरोध होता. तसेच पती शेखर हा व्यवसायानिमित्त रात्री उशिरा 11 ते 12 च्या सुमारास घरी परतत असे, ज्यावर तिने आक्षेप घेतला होता. ही बाब तिने सासू अरुणाबाई आणि सासरे चंद्रकांत यांनाही सांगितली होती, मात्र तिला न्याय मिळण्याऐवजी तिचा छळ वाढला.










