आईला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले, 14 वर्षीय मुलासोबत आईने काय केले? हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यानंतर आपले अनैतिक संबंध बाहेर येण्याची भीती वाटल्याने आईने आपल्या पोटच्या मुलालाच संपवले. यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. आणि तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा होता. आपल्या 14 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करताना आईचे हात जरादेखील कापले नसतील का असा प्रश्न विचारला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले
14 वर्षीय मुलासोबत आईने काय केले?
Crime News : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. यानंतर आपले अनैतिक संबंध बाहेर येण्याची भीती वाटल्याने आईने आपल्या पोटच्या मुलालाच संपवले. यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. आणि तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा होता. आपल्या 14 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करताना आईचे हात जरादेखील कापले नसतील का असा प्रश्न विचारला जात आहे. आयुष कुमार असे या मुलाचे नाव असून झारखंडच्या बरहरवा परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : 23 वर्षीय तरुणाचे 7 वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार, मशिदीच्या छतावर नेत नको तेच... सीसीटीव्हीतून सत्य आलं समोर
वडिलांच्या तक्रारीनंतर तपासाला वेग
7 फेब्रुवारी 2026 रोजी रतनपुर येथील एका तलावाजवळ आयुष कुमारचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. सुरुवातीला हे प्रकरण अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हत्येचे वाटत होते. मुलाचे वडील हेमंत कुमार साह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मृताची आई मीनू देवी (33) आणि तिचा प्रियकर रोहित साहा (30) यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अनैतिक संबंधांतून घडले हत्याकांड
मीनू देवी आणि तिचा नात्याने भाचा लागणारा रोहित साहा यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 7 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा आयुषचे वडील घरी नव्हते, तेव्हा मीनूने रोहितला घरामागे भेटायला बोलावले होते. दुर्दैवाने, आयुषने त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि या गोष्टीला तीव्र विरोध केला. आपले हे गुपित उघड होईल आणि समाजात बदनामी होईल, या भीतीने या दोघांनी मिळून आयुषचा गळा आवळून त्याला कायमचे संपवले.










