धाराशिव : ठाकरे गटाच्या उप-तालुकाप्रमुखाच्या शेतात अफूची शेती, 72 लाख रुपये किमतीची अफूची झाडे जप्त; ओमराजेंच्या भूमिकेकडे लक्ष
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपतालुकाप्रमुखाने कांदा पिकामध्ये बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 485 किलो 650 ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याची अंदाजे किंमत 72 लाख 84 हजार 750 रुपये इतकी आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव : ठाकरे गटाच्या उप तालुकाप्रमुखाच्या शेतात अफूची शेती
72 लाख रुपये किमतीची अफूची झाडे जप्त
ओमराजेंच्या भूमिकेकडे लक्ष
Dharashiv News, गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपतालुकाप्रमुखाने कांदा पिकामध्ये बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 485 किलो 650 ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याची अंदाजे किंमत 72 लाख 84 हजार 750 रुपये इतकी आहे. दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात एका शेतात लपूनछपून अफूची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
हे ही वाचा : महाराष्ट्रातलं असं एक गाव जिथं आंतरजातीय विवाह थाटात लावले जाणार! 'जातमुक्ती'साठी ऐतिहासिक निर्णय
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व्हे क्रमांक 163, मौजे दशमेगाव येथे पाहणी केली असता कांदा पिकाच्या आंतरपिकामध्ये मोठ्या प्रमाणात अफूची लागवड आढळून आली. सदर अफूच्या झाडांना पांढऱ्या व गुलाबी रंगाची फुले तसेच मोठी बोंडे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हे शेत समाधान मनोहर उघडे (रा. दशमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचे असल्याचे निष्पन्न झाले असून, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांनीच ही लागवड केल्याची माहिती पोलिसांना दिली. नायब तहसीलदार वाशी व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही अफूची झाडे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 45/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 (क) व 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व वाशी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.










