जळती चिता पोलिसांनी विझवली; अर्धवट जळालेला मृतदेह का घेतला ताब्यात, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : उत्तर प्रदेशातील आग्र्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे एका मुस्लिम तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि तिच्या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांनी मोठी कारवाई केली. 21 वर्षीय सना नावाच्या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा पती अजित सिंग हा गावातील स्मशानभूमीत तिचा अंत्यसंस्कार करत होता. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पेटती चिता पाण्याने विझवली आणि अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जळती चिता पोलिसांनी विझवली

point

अर्धवट जळालेला मृतदेह का घेतला ताब्यात

point

नेमकं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील आग्र्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे एका मुस्लिम तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि तिच्या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांनी मोठी कारवाई केली. 21 वर्षीय सना नावाच्या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा पती अजित सिंग हा गावातील स्मशानभूमीत तिचा अंत्यसंस्कार करत होता. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पेटती चिता पाण्याने विझवली आणि अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला.

हे ही वाचा : सुनेवर वेश्या व्यवसायासाठी दबाव, सासर की दलालांचं घर? सुनेनं घेतला टोकाचा निर्णय

चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह

सना आणि अजित सिंग यांनी चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता आणि तेव्हापासून ते उत्तर प्रदेशातील किरावली क्षेत्रातील जाजऊ गावात एकत्र राहत होते. बुधवारी (11 फेब्रुवारी) दुपारी 3 च्या सुमारास सनाची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. अजितने ग्रामस्थांच्या मदतीने घाईघाईत अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार, तिचा मृत्यू टीबीच्या आजारामुळे झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र माहेरच्या मंडळींनी हत्येचा संशय व्यक्त केल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.

अल्पवयीन असतानाच फूस लावून पळवून नेले

सनाच्या वडिलांनी, निजाम यांनी आरोप केला आहे की, अजित हा फायनान्सच्या हप्त्यांच्या बहाण्याने त्यांच्या घरी येत असे आणि त्याने त्यांच्या मुलीला अल्पवयीन असतानाच फूस लावून पळवून नेले होते. लग्नानंतर तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता, असा गंभीर दावाही वडिलांनी केला आहे. आपली मुलगी आजारपणामुळे नाही, तर सासरच्या जाचामुळे आणि घातपातामुळे मरण पावली असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp