पीएम मोदी अन् अमित शाहांना टॅग करत रोहित पवारांची पोस्ट, अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी मागणी

मुंबई तक

Rohit Pawar on death of Ajit Pawar : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मात्र हा अपघात नसून यामागे घातपात असण्याची शंका अनेकांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी अपघाताविषयी शंका व्यक्त करणारे एक प्रेझेंटशन दिले. यामध्ये त्यांनी व्हीएसआर या विमान कंपनीविषयी अनेक धक्कादायक दावे केले. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी वारंवार शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, आज रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. विमान कंपनीच्या मालकालर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यासोबतच या विमान कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांची मागणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

rohit pawar on death of ajit pawar
rohit pawar on death of ajit pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीएम मोदी अन् अमित शाहांना टॅग करत रोहित पवारांची पोस्ट

point

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी मागणी

Rohit Pawar on death of Ajit Pawar : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मात्र हा अपघात नसून यामागे घातपात असण्याची शंका अनेकांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी अपघाताविषयी शंका व्यक्त करणारे एक प्रेझेंटशन दिले. यामध्ये त्यांनी व्हीएसआर या विमान कंपनीविषयी अनेक धक्कादायक दावे केले. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी वारंवार शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, आज रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. विमान कंपनीच्या मालकालर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यासोबतच या विमान कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांची मागणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

हे ही वाचा : कांद्याच्या पिकात अफूची लागवड, उपतालुका प्रमुखाचा प्रताप समोर येताच ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय

'सरकार विमान कंपनीवर कारवाईला का घाबरत आहे?'

अजित पवार यांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते व्हीएसआर या कंपनीचे होते. या कंपनीवर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, 'निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?'

'कंपनीवर तात्काळ बंदी घालावी'

या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती सरकारला केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, 'देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.'  

हे वाचलं का?

    follow whatsapp