अहिल्यानगर : वर्गशिक्षकाकडून 4 विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार, नराधम न्यायालयाजवळ पोहोचताच महिलांनी झोडपलं
Ahilyanagar Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर संबंधित शिक्षकाने आणखी तीन ते चार विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले. या तक्रारीनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहिल्यानगर : वर्गशिक्षकाकडून 4 विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार
नराधम न्यायालयाजवळ पोहोचताच महिलांनी झोडपलं
Ahilyanagar Crime News , श्रीरामपूर : शहरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेतील वर्गशिक्षकाने चार विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळलीये. नराधमाला न्यायालयात नेताना महिलांनी त्याच्या कानशिलात लगावलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर संबंधित शिक्षकाने आणखी तीन ते चार विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले. या तक्रारीनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन गोणारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधित शिक्षकाने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, याची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा : ज्योतिषाकडून ब्रेन वॉश, मुलीने स्वत:च्या आईला झोपेत असतानाच संपवलं, नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला










