रामराजे नाईक निंबाळकरांना तगडा झटका, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुलाचा पराभव; फलटणमध्ये काय घडलं?

मुंबई तक

Phaltan Nagarpalika Election Result : नगरपरिषदेच्या एकूण 27 जागांपैकी 16 जागांवर भाजपने विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेत सत्तांतर निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट पराभव झाल्याने त्यांच्या गटाची राजकीय ताकद कमी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ADVERTISEMENT

Phaltan Nagarpalika Election Result
Phaltan Nagarpalika Election Result
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रामराजे नाईक निंबाळकरांना तगडा झटका

point

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुलाचा पराभव; फलटणमध्ये काय घडलं?

Phaltan Nagarpalika Election Result : फलटण नगरपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांचे चिरंजीव, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार अनिकेत राजे निंबाळकर यांचा पराभव झाला असून भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल 600 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या निकालामुळे फलटणमध्ये सत्तांतर घडून आले असून भाजपने नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे.

संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर मैदानात होते, तर शिवसेना (शिंदे गट) कडून अनिकेत राजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारासाठी सभा घेतली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारासाठी प्रचार केला. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

अखेर मतमोजणीत भाजपने बाजी मारत नगराध्यक्षपदावर आपला दावा सिद्ध केला. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयामुळे भाजप–राष्ट्रवादी युतीला मोठे यश मिळाले असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या विजयाचे शिल्पकार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या रणनीतीमुळे आणि संघटनात्मक ताकदीमुळे भाजपला फलटणमध्ये निर्णायक यश मिळाल्याचे मानले जात आहे.

नगरपरिषदेच्या एकूण 27 जागांपैकी 16 जागांवर भाजपने विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेत सत्तांतर निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट पराभव झाल्याने त्यांच्या गटाची राजकीय ताकद कमी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp