घरात प्लंबर हवा असला तरी तो हिंदूच बोलवा, तो उर्मट असला तरी चालेल; शरद पोंक्षे यांचं वक्तव्य

मुंबई तक

Sharad Ponkshe on Muslim : 'हिंदू माणसाने हिंदूकडेच खरेदी करावी, अहिंदू माणसांकडे कोणतीही खरेदी करू नये. तसेच आपल्या घरातील दैनंदिन वापराच्या काही गोष्टी बिघडल्या तर त्या हिंदू टेक्निशियन कडूनच दुरुस्त करून घ्याव्यात. तुमच्या घरात येणारा कारपेंटर, प्लंबर हा हिंदूच असला पाहिजे. तो कितीही उर्मट असला, चार दिवसांनी येणारा असला तरी चालेल. धर्मांतर होण्यापेक्षा चार दिवस उशीर झाला तरी चालेल. आणि हे सांगण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे' असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदूत्व वादाचे पुरस्कर्ते शरद पोंक्षे यांनी सांगलीत बोलताना केले. ते हिंदू व्यवसाय बंधू सनी सर्वमंगल ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू व साहित्य प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. 

ADVERTISEMENT

Sharad Ponkshe on Hindu and Muslim
Sharad Ponkshe on Hindu and Muslim
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घरात प्लंबर हवा असला तरी तो हिंदूच बोलवा, तो उर्मट असला तरी चालेल

point

शरद पोंक्षे यांचं वक्तव्य

Sharad Ponkshe on Hindu and Muslim : 'हिंदू माणसाने हिंदूकडेच खरेदी करावी, अहिंदू माणसांकडे कोणतीही खरेदी करू नये. तसेच आपल्या घरातील दैनंदिन वापराच्या काही गोष्टी बिघडल्या तर त्या हिंदू टेक्निशियन कडूनच दुरुस्त करून घ्याव्यात. तुमच्या घरात येणारा कारपेंटर, प्लंबर हा हिंदूच असला पाहिजे. तो कितीही उर्मट असला, चार दिवसांनी येणारा असला तरी चालेल. धर्मांतर होण्यापेक्षा चार दिवस उशीर झाला तरी चालेल. आणि हे सांगण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे' असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदूत्व वादाचे पुरस्कर्ते शरद पोंक्षे यांनी सांगलीत बोलताना केले. ते हिंदू व्यवसाय बंधू सनी सर्वमंगल ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू व साहित्य प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. 

हे ही वाचा :

..म्हणून हिंदूंचे प्रदर्शन भरवण्याची वेळ येते

या कार्यक्रमात बोलताना पोंक्षे म्हणाले की, 'आपल्या घरातील  फ्रीज, फॅन यासारख्या काही वस्तू बिघडल्या तर दुरुस्त करण्यासाठी हिंदू टेक्निशियनच बोलवावा. अशा सेवा देणाऱ्यांचे नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये शेयर करावेत. हिंदूनी हिंदूंसाठीच व्यवसाय करावा. घरी लागणाऱ्या भाज्या, वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात. अहिंदू माणसाकडे कोणतीही खरेदी करू नये. मालेगाव महापालिकेच्या  मुस्लिम महिला उपमहापौर यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा  फोटो लावला आहे. ज्याने हजारो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवले. लाखो लोकांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारणास भाग पाडले. मंदिरे उध्वस्त केली, मूर्त्या फोडल्या. अशा माणसाचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर महिलेने लावला आहे. इतकी भयाण परिस्थिती आहे. म्हणून अशी हिंदूंची प्रदर्शने भरवण्याची वेळ येते.'

'प्लंबर चार दिवसांनी आला तरी चालेल' 

'तुमच्या घरात येणारा कारपेंटर, प्लंबर हा हिंदूच असला पाहिजे. तो कितीही उर्मट असला, चार दिवसांनी येणारा असला तरी चालेल. धर्मांतर होण्यापेक्षा चार दिवस उशीर झाला तरी चालेल. चाळीस दिवस अनन्वित यातना सोसून प्राण सोडले तरी धर्म न बदलणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे,' असेही पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp