ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून मनसेचे 'पाटील' तुफान नाचले, 24 तासात भाजपात निघून गेले!
Dinkar Patil: मनसेचे नाशिकमधील नेते दिनकर पाटील यांनी अचानक आज (25 डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीचा जल्लोष काल (24 डिसेंबर) साजरा केला आणि आज थेट भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षांतर मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असून, भाजपने विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना गळाला लावण्याची रणनीती यशस्वी केली आहे. दिनकर पाटील यांच्यासह दोन माजी महापौर आणि इतर दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या गटाने तीव्र विरोध दर्शवला.
दिनकर पाटलांचा ठाकरेंच्या युतीचा जल्लोष आणि 24 तासात भाजपमध्ये प्रवेश
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (UBT) आणि राज ठाकरेंच्या मनसे यांच्यातील युतीची घोषणा काल मुंबईत झाली. या युतीचे स्वागत करत नाशिकमध्ये मनसे आणि UBT शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिनकर पाटील या जल्लोषात आघाडीवर होते. त्यांनी पेढे वाटले, ढोल-ताशे लावून नाचले आणि युतीच्या समर्थनात उत्साह दाखवला. मात्र, अवघ्या 24 तासांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला.

हे ही वाचा>> नाशकात राडा, ठाकरेंच्या युतीनंतर पेढे वाटणारे विनायक पांडे भाजपात जाणार, पण फरांदेंनी वाट अडवली अन्
दिनकर पाटील यांनी यापूर्वी मनसेतून विधानसभा निवडणूक लढवली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये ते भाजप सोडून मनसेत दाखल झाले होते आणि नाशिक पश्चिममधून उमेदवारी मिळवली होती. आता युतीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत.
दिनकर पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झालेले नेते:
- विनायक पांडे: UBT शिवसेनेचे माजी महापौर.
- यतीन वाघ: मनसेचे पहिले महापौर, नंतर UBT शिवसेनेत.
- नितीन भोसले: माजी आमदार (मनसे), सध्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत.
- शहू खैरे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष.
- संजय चव्हाण: UBT शिवसेनेचे नेते.
हे ही वाचा>> देवेंद्र फडणवीस खरंच 'अल्लाह हाफीज' म्हणाले होते का.. राज ठाकरे म्हणाले तो दावा खरा की खोटा?
या नेत्यांसह अनेक माजी नगरसेवकही भाजपमध्ये सामील झाले. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "लोक भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून येत आहेत. नाशिक महापालिकेच्या 122 जागांपैकी 100 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू.










