देवेंद्र फडणवीस खरंच 'अल्लाह हाफीज' म्हणाले होते का.. राज ठाकरे म्हणाले तो दावा खरा की खोटा?
Devendra Fadnavis allah hafiz Video: 'देवेंद्र फडणवीस देखील 'अल्लाह हाफीज' म्हणाले होते. त्याचा व्हिडिओ आहे..' असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. जाणून घ्या राज ठाकरेंचा हा दावा खरा आहे का.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (24 डिसेंबर) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना एक खळबळ उडवून देणारा दावा केला. फडणवीस यांनी 'अल्लाह हाफीज' असं म्हटलंय आणि त्याचा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे. असा दावा राज ठाकरेंनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केले, ज्यात दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या युतीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले असून, फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज ठाकरेंचा दावा आणि पत्रकार परिषदेचा संदर्भ
आज दुपारी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ देत मनसेआणि शिवसेना UBT च्या युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) अल्लाह हाफीज बोलले, माझ्याकडे असंख्य व्हिडीओ आहेत. ट्रेलर नव्हे, संपूर्ण पिक्चर दाखवणार."
हे ही वाचा>> 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हे विधान फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टीका करणारे असून, राज ठाकरेंनी फडणवीस यांना 'बेगडी हिंदुत्व' असल्याचा आरोप केला. त्यांनी पुढे सांगितले की, फडणवीस यांचा हा व्हिडिओ ते लवकरच जाहीर करतील आणि यामुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चा आणखी तीव्र होईल.
राज ठाकरेंच्या या आरोपाने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर मुस्लिम समाजाशी संबंधित कार्यक्रमात 'अल्लाह हाफीज' म्हणण्याचा आरोप केला, ज्यामुळे भाजपच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.










