धोनीचा ताबा सुटला, वेगाने कार चालवणं भोवलं, रस्त्यावर थरार अन् दंडात्मक कारवाई

मुंबई तक

Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. झारखंड राज्याच्या गृहनिर्माण मंडळाकडून रांची येथील निवासी जागेचा गैरवापर केल्याप्रकरणी महेंद्र सिंहला धोनीला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा धोनीवर गंभीर आरोप आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने धोनीला बसला दंड

point

राज्य गृह मंडळाकडून धोनीला नोटीस

Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. झारखंड राज्याच्या गृहनिर्माण मंडळाकडून रांची येथील निवासी जागेचा गैरवापर केल्याप्रकरणी महेंद्र सिंहला धोनीला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा धोनीवर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. आगामी आयपीएल 2026 साठी तो चेन्नई सुपरकिंग्जच्या शिबिरात सामील होण्यासाठी चेन्नईला रवाना होण्याआधी ही घटना घडल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : सासऱ्याची लेकीसारख्या सुनेवर वाईट नजर, महिलेच्या कंबरेला चुकीचा स्पर्श... पीडितेनं घरात लावले सीसीटीव्ही

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने धोनीला बसला दंड

वृत्तानुसार,रांचीतील वाहतूक देखरेख यंत्रणेनं वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात धोनीवर कलम 183 अंतर्गत ई-चलान जारी करण्यात आले. वेगाची मर्यादा ओलांडल्याने 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्या वाहनाचे चलन जारी करण्यात आले, ते वाहन काळ्या रंगाची मर्सडिज असल्याचे सांगण्यात येत आहे.  

रांची न्यूज १२८० ७२० (२७)

राज्य गृह मंडळाकडून धोनीला नोटीस

काही दिवसांआधी झारखंड राज्य गृह मंडळाने भारतीय क्रिकेट दिग्गज आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला नोटीस बजावली होती. जामिनाच्या कथित व्यवसायिक वापराबद्दल ही नोटीस बजावण्यात आली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp