'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadanvis : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी केलाय'
'खोदा पहाड़ और निकला चूहा'
Devendra Fadanvis : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 24 डिसेंबर रोजी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. ते एकत्रित येण्याने काहीतरी राजकारणात घडेल तो समज बाळबोज असेल,' असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं. तसेच त्यांनी या युतीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला 'खोदा पहाड और निकला चुहा', म्हणत डिवचलं
हे ही वाचा : Raj-Uddhav Thackeray: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो...', युती होताच राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नुकतीच ठाकरे बंधुंनी आपल्या युती जाहीर केली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या एकत्र येण्याने राजकारणार फार काही होणार नाही. जर कोणाला काही वाटत असेल तर तो बाळबोज असेल. ते एकत्र आले याचा आम्हाला आनंद तर आहेच. तसेच काही माध्यम देखील असं दाखवत आहेत, की. रशिया आणि युक्रेनची जणू काही युतीच होत आहे. मला असं वाटतं की, कोणत्याही एका पक्षाला निवडणुकीसाठी पक्षाचं अस्तित्व टिकवावं लागतं, त्यासाठी केलेली ही युती आहे. याच्या पलिकडून फार काही अन्वयार्थ काढण्यात येऊ नये. ज्याने फार काही परिणाम होईल हे मला वाटत नाही. नंतर त्यांनी टीकेची ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.
'मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी केलाय'
ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी केलाय. मुंबईतून मराठी माणूस बाहेर घालवण्याचे पाप यांनी केलं आहे. यामुळे आता मराठी माणूस आता यांच्यासोबत नाही. ज्याप्रकारे अमराठी माणसांवर जे हल्ले करण्यात आले होते, त्यामुळे आता ते देखील यांच्यासोबत नाहीयेत. निवडणुका आल्या की, नुसतं भावनिक बोलायचं. पण आता भावनिकतेचा जनता भुलणारी नाही, त्यामुळे निश्चितपणे त्यांनी आणखी दोन ते चार लोकांना एकत्र घेतली तरी काहीही होणार नाही. कारण ज्या पद्धतीचा मुंबईचा विकास सुरु आहे. विशेषत: मराठी माणसांना मुंबईतच घरं देण्याचं काम सुरु असून यामुळे महायुतीच्या मागे मुंबईकर उभे आहेत.
हे ही वाचा : 'कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा...', राज-उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
'खोदा पहाड़ और निकला चूहा'
तसेच त्यांनी ठाकरेंनी युतीची घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टोला लगावला. ते म्हणाले की, जी पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्यामागे जो काही हाईप तयार करण्यात आला होता, पण नंतर 'खोदा पहाड़ और निकला चूहा' असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.










