नागपूर महापालिकेतील नगरसेविकेला भाजपकडून राज्यसभेची संधी, कोण आहेत माया इवनाते?

योगेश पांडे

Maya Ivnate Profile : माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. 15 डिसेंबर 2007 ते 23 डिसेंबर 2009 पर्यंत नागपूर महानगरपालिका मध्ये महापौर पद भूषवले..अनेक वर्षांपासून नागपूर शहर भाजप मध्ये सक्रिय आहेत. शहर, प्रदेश भाजप मध्ये विविध पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे. आदिवासी समाजातून येतात.

ADVERTISEMENT

Rajyasabha Election
Rajyasabha Election
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर महापालिकेतील नगरसेविकेला भाजपकडून राज्यसभेची संधी

point

कोण आहेत माया इवनाते?

Maya Ivnate Profile : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आज (दि.4) महाराष्ट्रातील जागांसाठी उमेदवार यादी जाहीर केली. यापूर्वी भाजपने इतर राज्यातील 9 जागांसाठी पहिली यादी जाहीर केली होती. नव्या यादीत भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न राबवलेला पाहायला मिळालाय. दलित, आदिवासी, मराठा आणि धनगर समाजातील नेत्यांना भाजपने राज्यसभेची संधी दिलीये. यामध्ये विनोद तावडे, रामदार आठवले,  रामराव वडकुते, माया इवनाते या चार नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे माया इवनाते या नागपूर महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलीये. माया इवनाते कोण आहेत? जाणून घेऊयात... 

माया इवनाते कोण आहेत?

माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. 15 डिसेंबर 2007 ते 23 डिसेंबर 2009 पर्यंत नागपूर महानगरपालिका मध्ये महापौर पद भूषवले..अनेक वर्षांपासून नागपूर शहर भाजप मध्ये सक्रिय आहेत. शहर, प्रदेश भाजप मध्ये विविध पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे. आदिवासी समाजातून येतात. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग  ( NCST) च्या सदस्य पदी राहिलेल्या आहेत.  2026 निवडणुकीत नागपूर महानगरपालिका मध्ये प्रभाग 12 मधून भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.  यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष नागपूर महानगरपालिका मध्ये नगरसेवक राहिलेल्या आहेत.

राज्यसभेसाठी भाजपचं सोशल इंजिनीअरिंग, आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी.

माया चिंतामण इवनाते या नागपूरमधील एक प्रमुख आदिवासी नेत्या, माजी महापौर आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाच्या (NCST) माजी सदस्य आहेत. त्यांनी गोरेवाडा प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध करून आदिवासी अस्मितेसाठी लढा दिला होता. त्या भाजपशी संबंधित असून, आदिवासींच्या हक्कासाठी कार्यरत आहेत. 

हे वाचलं का?