Lok Sabha : ''ठाकरेंनी मोदी, फडवणीसांचा विश्वासघात केला', मुंबई Tak चावडीवर पीयूष गोयलांची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 piyush goyal criticize udhhav thackeray on bjp shiv sena alliance north mumbai lok sabha mumbai tak chavadi
राहुल गांधी कधीपासून वायनाडचे झाले ?
social share
google news

Mumbai Tak Chavadi, Piyush Goyal : 'भाजपसोबत युती तोडून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसोबत विश्वासघात केला, महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात केला आणि मोदी आणि फडणवीसांसोबत विश्वासघात' केल्याची बोचरी टीका भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पीयुष गोयल यांनी मुंबई Tak चावडीवर  केली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचेही गोयल (Piyush Goyal) यांनी यावेळी सांगितले.  (lok sabha election 2024 piyush goyal criticize udhhav thackeray on bjp shiv sena alliance north mumbai lok sabha) 

मुंबई तक चावडीवर आज भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पीयूष गोयल उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. पीयुष गोयल यांच्यावर संजय राऊत यांनी बाहेरील उमेदवार असल्याची टीका केली होती. या टीकेवर पीयूष गोयल म्हणाले, 'वर्षा गायकवाड या धारावीच्या आहेत आणि त्या उत्तर मध्यमधून लढतायत.मग त्या पण बाहेरील उमेदवार झाल्या, आदित्य ठाकरे वरळीतून लढले होते. ते पण बाहेरील उमेदवार झाले. आणि राहुल गांधी कधीपासून वायनाडचे झाले ? ते ना वायनाडचे ना रायबरेलीचे आहेत. ते नेमके आहे कुठले हेच माहित नाही,  असा टोला गोयल यांनी यावेळी विरोधकांना  लगावला. त्यामुळे संजय राऊत यांनी उत्तर मुंबईत येऊन सांगाव आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड राहुल गांधी कुठचे आहेत?'' असे आव्हान गोयल यांनी दिले. 

हे ही वाचा : अमित शाहांचा केजरीवालांवर पटलवार, 'देशाचं प्रतिनिधित्व हे...'

 
पीयूष गोयल यांनी यावेळी भाजप-शिवसेनेच्या युती तुटल्याच्या घटनेवरही भाष्य केले.  ''हिंदुत्वावर संपूर्ण शिवसेना चालली होती. 2019 ची निवडणूक मोदींच्या नावावर शिवसेनेने जिंकली होती. स्टेजवर उद्धव ठाकरेंच्या समोर अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चारले होते. तेव्हा तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती,'' असे गोयल यांनी यावेळी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Imtiyaz Jaleel : 'नवनीत राणा चीप मेंटलिटीची बाई, प्रसिद्धीसाठी नाचायला...'

तसेच ''उद्धव ठाकरेंनी युती तोडून शिवसेनेसोबत विश्वासघात केला. बाळासाहेबांच्या मुळ सिद्धांतांना पायदळी तुडवलं आणि मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. पण बाळासाहेब म्हणाले होते, ज्यावेळेस मला काँग्रेससोबत जावं लागेल, त्यावेळेस मी शिवसेना नावाचा पक्ष मी बंद करेन, असे पीयूष गोयल म्हणाले. निराधार मुद्दे काढून ठाकरेंनी शिवसेनेसोबत विश्वासघात केला, महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात केला आणि मोदी आणि फडणवीसांसोबत विश्वासघात केला'', अशी टीका गोयल यांनी ठाकरेंवर केली.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT