पतीच्या मृत्यूनंतर दिरासोबत प्रेमसंबंध! पण, एके दिवशी ऊसाच्या शेतात बोलवून केला गेम अन्...
एका तरुणाने आपल्याच वहिनीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मृत महिलेला दोन मुलं असून आरोपीने त्यांचा देखील विचार केला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीच्या मृत्यूनंतर दिरासोबत प्रेमसंबंध!
एके दिवशी ऊसाच्या शेतात बोलवून केला गेम अन्..
Crime News: अनैतिक संबंधातून बऱ्याच धक्कादायक घटना घडत असतात. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून अशीच एक भयंकर बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्याच वहिनीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मृत महिलेला दोन मुलं असून आरोपीने त्यांचा देखील विचार केला नाही.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरण हे नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील रहिवासी असलेल्या सुनैना नावाच्या महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर, पीडिता तिच्या दोन मुलांसह एकटीच राहत होती. मात्र, अशातच आरोपी तरुणाने महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेतला आणि त्याने आपल्या वहिनीसोबत जवळीक साधली. कालांतराने, पीडिता तिच्या दिराच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती! तात्काळ काम थांबवण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश...
ऊसाच्या शेतात बोलवून हत्या...
आरोपी तरुणाचं नाव वसंत असून तो त्याच्या वहिनीला आपल्या पत्नीसारखी वागणूक द्यायचा. त्यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, आरोपी बसंतला त्याची वहिनी दुसऱ्या पुरुषासोबत बोलत असल्याचा संशय आला आणि याच कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. या रागाच्या भरात वसंतने एक कट रचला. त्याने 26 नोव्हेंबर रोजी सुनैनाला ऊसाच्या शेतात बोलवलं आणि तिथे तिचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, त्याने पीडितेचा मृतदेह ठिकाणी लावला आणि तिथून फरार झाला.
हे ही वाचा: पुण्यातील शाळकरी मुलीचा धक्कादायक प्रताप, शिक्षिकेलाच 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस अन् हातावर नाव कोरून आत्महत्येची धमकी...
मानवी सांगाडा मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस
सुनैना बेपत्ता असल्याचं समजताच तिचा मुलगा अंगदने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, तिचा काहीच पत्ता न लागल्याने त्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तब्बल 26 दिवसांनंतर, ऊसाच्या शेतात मानवी सांगाडा मिळाल्यानंतर प्रकरणाला वेगळंच वळण आलं. पोलिसांनी याचा सखोल तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी सुनैनाचे मोबाईल डिटेल्स तपाल्यानंतर, वसंतची माहिती मिळाली आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या कठोर चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला.










