लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं? नेमकं प्रकरण काय?
एका लग्न ठरलेल्या तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्न ठरलेल्या तरुणाचं होणाऱ्या बायकोसोबत भयानक कृत्य...
असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं?
Crime News: उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आरोपी तरुणाने त्याच्या प्रेयसी आणि प्रेयसीच्या आईसोबत मिळून एका 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पीडित तरुणीची गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आणि नंतर पुरावे मिटवण्यासाठी तिचा मृतदेह आगीत जाळून टाकल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शालिमुनिश अशी मृत तरुणीची ओळख समोर आली असून ती बलरामपूरच्या लालडीह हुसैनाबाद ग्रँट परिसरातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी तिचं गोंडा जिल्ह्यातील छपिया येथे राहणाऱ्या इमरान नावाच्या तरुणासोबत लग्न ठरलं होतं. मात्र, दोघांच्या लग्नापूर्वीच ही भयानक घटना घडली. नेमकं प्रकरण काय?
लग्न ठरल्यानंतर तरुणाचे दुसरीकडे प्रेमसंबंध...
बलरामपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतर इमरानची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सकीना नावाच्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर, दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पीडिता शालिमुनिशला तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमसंबंधाबद्दल कळताच तिने आरोपीला याबाबत जाब विचारला आणि त्यामुळे त्यांच्यात वाद झाले.
हे ही वाचा: नंदुरबार: आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून 8 वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल...
गळा दाबून केली हत्या
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी इमरानने शालिमुनिशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या हत्येचा कट रचण्यात आला. योजनेनुसार, सकीनाने पीडित तरुणीला तिच्या घरी बोलवलं. तिथे, इमरान सुद्धा उपस्थित होता. त्यावेळी, त्या दोघांनी मिळून पीडित शालिमुनिशचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपींनी ही घटना आत्महत्या असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.










